मुंबई : हल्ली वजन वाढ ही समस्या फार गंभीर झाली आहे. वजन नियंत्रित आणण्यासाठी व्यक्ती अनेक मार्ग अवलंबतात. त्यामध्ये जिमला प्राधान्य दिले जाते. परंतु अनेक वेळा नियमित जिम केल्याने देखील वजन नियंत्रित राहत नाही. त्यामुळे तणाव वाढतो. तणावामुळे देखील वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टर नेहमी किमान १ तास चालण्याचा सल्ला देतात. जिम केल्याने देखील वजन कमी होत नसेल तर खाली दिलेले उपाय करून पाहा.
सर्वात आधी रात्री मसालेदार आणि भरपूर आहार करणं टाळा. तिखट आणि प्रमाणाबाहेर आहार घेतल्यास ते पचायला फार कठीण जातं. परिणामी त्याचं रूपांतर फॅट्समध्ये होतं
रात्री झोपण्याच्या किमान ३ तासापूर्वी मद्याचे सेवन करणे टाळावे. झोपताना अधिक कॅलरीज बर्न होते. शक्य झाल्यास मद्याचे सेवन करणं टाळावं.
झोपण्यापूर्वी सतत फोन चेक करण्याची सवय असेल तर या सवयीला मुरड घालावी लागेल. कारण यातून निघणार्या शॉर्ट वेवलेंथ ब्लु लाइट्स आपल्या शरीराचे चयापचय क्रिया कमी करते
कूलिंगमध्ये झोपणारे ७ टक्के जलद गतीने कॅलरीज बर्न करतात. कारण थंड वातावरणातून सामान्य तापमान करण्यासाठी शरीर अधिक मेहनत घेतं ज्याने जलद गतीने कॅलरीज बर्न होऊ लागतात.
कमी झोप घेणार्यांचे वजनदेखील जलद गतीने वाढतं. म्हणून किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. तसेच पूर्ण पणे अंधारात झोपल्याने आपले शरीर अधिक मेलाटोनिन तयार करते. याने फॅट्स बर्न होण्यात मदत मिळते.