वॉशिंग्टन : आता एक मस्त बातमी. कोरोना अँटीबॉडीज ( (COVID-19 antibodies) असलेलं जगातलं पहिलं बाळ जन्माला आले आहे. या बाळामध्ये जन्मतःच कोरोनाच्या अँटीबॉडीज (Baby Born With COVID-19 Antibodies) आहेत. हे कसं शक्य झालं आणि कुठे जन्माला आलेय हे सुपर बेबी. याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट.
अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये एक बाळ जन्माला आलं आणि अवघ्या जगात आनंदी आनंद झाला. कारण हे बाळ जन्माला आलंय तो कोरोनाच्या अँटीबॉडीज घेऊनच. (COVID-19 antibodies in-utero, a baby was born with antibodies to a mother who was vaccinated while pregnant.)
या बाळाची आई आरोग्यसेविका आहे. तिनं गरोदर असताना मॉडर्नाची लस घेतली. ती 36 आठवड्यांची गरोदर असताना तिने डोस घेतला. तिच्यामध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज नाळेमधून बाळापर्यंत पोहोचल्या. जानेवारीमध्ये तिने सुदृढ मुलीला जन्म दिला.या बाळामध्ये जन्मतःच कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.
फ्लोरिडात जन्माला आलेलं हे बाळ कोरोनाच्या अँटीबॉडीजसह जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ आहे. या बाळाच्या आईच्या धाडसाचंही कौतुक होत आहे. कारण तिनं बाळ जन्माला येण्याआधी काही दिवसच ही लस घेण्याची तयारी दाखवली.... आता भविष्यात जगभरातल्या आई होणा-या महिलांना लस दिली जाईल आणि लसीतल्या अँटीबॉडीज बाळांपर्यंत पोहोचतील. कोरोनाच्या अँटीबॉडीजसह जन्मलेल्या या बाळामुळे एक नवी आशा निर्माण झाली आहे. पुढची पिढी कोरोना फ्री जन्माला येण्याची.