अपचन आणि गॅसच्या त्रासावर 'हे ' करा घरगुती उपाय

Gas Bloating Home Remedies in Marathi:आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात फास्ट फुड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अपचनासंबंधीत समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वेळेवर न जेवल्याने आम्लपित्ताचा त्रास होतो. मैद्याचे पदार्थ सतत खाल्ल्याने पोट फुगणं, अवेळी ढेकर येणं या सततच्या त्रासामुळे शरीराचं आरोग्य बिघडतं.पित्त आणि गॅस होण्याच्या समस्येवर काय करावेत घरगुती उपाय हे जाणून घेऊयात.

Updated: Feb 8, 2024, 03:37 PM IST
अपचन आणि गॅसच्या त्रासावर 'हे ' करा घरगुती उपाय title=

Gas Bloating Home Remedies in Marathi: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात फास्ट फुड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अपचनासंबंधीत समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वेळेवर न जेवल्याने आम्लपित्ताचा त्रास होतो. मैद्याचे पदार्थ सतत खाल्ल्याने पोट फुगणं, अवेळी ढेकर येणं या सततच्या त्रासामुळे शरीराचं आरोग्य बिघडतं.पित्त आणि गॅस होण्याच्या समस्येवर काय करावेत घरगुती उपाय हे जाणून घेऊयात.

पुदिन्याचं तेल (Peppermint Oil) 
पित्तामुळे होणारी जळजळ कमी करण्यासाठी पुदिन्याचं तेल फायदेशीर ठरतं. स्वयंपाकामध्ये पुदिन्याला खूप महत्त्व दिलं जातं. पुदिन्याच्या तेलाचे दोन थेंब टाकून कोमट पाणी प्यायल्याने शरीराचा दाह कमी होतो. त्याचबरोबर पुदिन्याच्या पानांचं सेवन केल्याने गॅस अपचनाचा त्रास कमी होतो. पुदिन्याचं तेल अनेक आजारांवर गुणकारी ठरतं. पोट फुगण्याचा त्रास सतत जाणवत असेल तर ओटीपोटाला पुदिन्याच्या तेलाने मालिश केल्याने आराम पडतो. 

खडा हिंग 
वरणाला फोडणी देताना हिंगाचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहितेय का ? गॅस होण्याच्या त्रासावर  खडा हिंग रामबाण उपाय ठरतो. छोटा चमचाभर हिंग कोमट पाण्यातून घेतल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो. 

जीरं 
जेवाणाला स्वादिष्ट बनविण्यासोबत शारीरिक आजारांवर जीरं फायदेशीर ठरतं. त्यामुळे जीऱ्याला  बहुगुणी म्हटलं जातं.  पित्ताच्या त्रासावर जीरं गुणकारी मानलं जातं. जीऱ्याचा गुणधर्म थंड असल्याने पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते, आणि गॅसचा त्रास कमी होण्यास मदत होते.  
    
ताक
ताकाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, पोट साफ न होणं यांसारखे त्रास कमी होतात. ताकाच्या सेवनाने आम्लपित्त कमी होण्यास मदत होते. दुपारच्या जेवणानंतर ताक प्यायल्याने पोटाच्या संबंधीत तक्रारी दूर होतात. 

सुरण 
पोट साफ होण्यासाठी सुरण फायदेशीर ठरते. सुरणाचे काप किंवा सुरणाची भाजी ही खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.   

कोमट पाणी पिणे
रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पोट फुगण्याची समस्या दूर होते. तसेच दिवसभरात मुबलक पाणी प्यायल्याने आम्लपित्त , जळजळ होणं कमी होतं.  

हिरव्या पालेभाज्या 
पोट साफ न होण्यामुळे त्वचेवर पुरळ येणं, त्यातबरोबर अॅलर्जीचा त्रास वारंवार होतो. हिरव्या पालेभाज्यांमध्या पाण्याची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्यास अपचनाचा त्रास कमी होतो. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. त्याचबरोबर त्वचेवरील अॅलर्जीचा त्रास होतो, आणि त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.  
   
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Gastro, Bloating, Home Made Remedies, Health, Lifestyle,Marathi Health Tips