दुधासोबत 'ही' फळं खाणे आरोग्याला नुकसानकारक

फळांचा आहारात समावेश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. 

Updated: May 9, 2018, 08:15 PM IST
दुधासोबत 'ही' फळं खाणे आरोग्याला नुकसानकारक  title=

मुंबई : फळांचा आहारात समावेश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. मात्र आजकाल सार्‍यांचेच आयुष्य धावपळीचे झाल्याने अनेकजण मिल्कशेक पिण्याचा पर्याय निवडतात. काहीजण फळं खायला वेळ नसतो म्हणून तर काही जण आवड म्हणून फळांचा मिल्कशेक पितात. पण तुम्हांला ठाऊक आहे का?  काही फळांचा दूधासोबत आहारात समावेश करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. 

संत्र - मोसंबी -  

संत्र - मोसंबी यासारखी आंबट फळं टाळा. अशा फळांमध्ये अ‍ॅसिड घटक असल्याने त्याचा दूधातील प्रोटीनसोबत संबंध आल्यास आरोग्याला त्रास होऊ शकतो. आंबट फळं दूधात मिसळल्याने दूध खराब होते. अशा प्रकारचे मिश्रण शरीरात गेल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो.  

फणस - 

फणसाचाही दूधासोबत आहारात समावेश करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. दूधासोबत फणस खाल्याने डायजेशन म्हणजे पचनक्रियेमध्ये बिघाड होतो. 

आंबट द्राक्ष, अननस यांचाही दूधासोबत आहारात समावेश करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतो. फळं ही नैसर्गिक स्वरूपात आणि चावून खाणंच आरोग्याला अधिक फायदेशीर आहे.  

कोणती फळं दूधासोबत खावीत ? 

पूर्ण पिकलेला गोड आंबा, केळं, चिकू अशी गोड फळं दूधासोबत खाणं आरोग्याला फायदेशीर ठरू शकतात. दूधासोबत गोड फळांचा आहारात समावेश करणं हितावह आहे. त्यामुळे मिल्कशेक करताना फळं नैसर्गिक स्वरूपात गोड असल्याची खात्री करून घ्या आणि मगच आहारात त्याचा समावेश करा.