मधूमेहींना फायदेशीर '६' फळं

  मधूमेहींचे खाण्या-पिण्याबाबतचे अनेक समज गैरसमज असतात. पथ्यपाण्याच्या कटकटीमुळे नेमके काय खावे आणि काय टाळावे हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. फळं ही आरोग्यदायी असली तरीही त्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असल्याने त्याचा आहारात समावेश करणे त्रासदायक वाटू शकतो. परंतू फळातील गोडव्यापेक्षा त्याच्या सेवनामुळे ग्लायस्मिक इंडेक्स किती वाढतो यावर त्याचे सेवन अवलंबून असते. लो ग्ल्यास्मिक इंडेक्सयुक्त फळं आहारात घ्या. 

Updated: Jan 8, 2018, 08:53 PM IST
मधूमेहींना फायदेशीर '६' फळं   title=

मुंबई :  मधूमेहींचे खाण्या-पिण्याबाबतचे अनेक समज गैरसमज असतात. पथ्यपाण्याच्या कटकटीमुळे नेमके काय खावे आणि काय टाळावे हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. फळं ही आरोग्यदायी असली तरीही त्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असल्याने त्याचा आहारात समावेश करणे त्रासदायक वाटू शकतो. परंतू फळातील गोडव्यापेक्षा त्याच्या सेवनामुळे ग्लायस्मिक इंडेक्स किती वाढतो यावर त्याचे सेवन अवलंबून असते. लो ग्ल्यास्मिक इंडेक्सयुक्त फळं आहारात घ्या. 
 
तज्ञांच्या सल्ल्यानुसार, केळं,द्राक्षं,आंबा, सीताफळ,,चिकू यासारखी फळं मधूमेहींनी प्रमाणात खावीत. तसेच अति पिकलेली फळं मधूमेहींनी शक्यतो टाळावीत. मग मधूमेहींनी नेमकी कोणती फळं खावीत याबाबतचा हा सल्ला नक्की जाणून घ्यावा. 

सफरचंद - 

एक मध्यम आकाराचे सफरचंद मधूमेही नक्कीच खाऊ शकतात. यामध्ये कॅलरीज कमी तर फायबर अधिक असते. मधल्या वेळेत पोटभरीसाठी सफरचंद खाणं फायदेशीर ठरतं. सफरचंदामधील quercetin आणि phytonutrients घटक मधूमेहींमधील वाढणारा हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. 

पीच - 

या फळामध्ये फायबर घटक मुबलक असतात. तसेच पीचमध्ये ग्ल्यासमिक इंडेक्स कमी असतात तर व्हिटॅमिन, अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक अधिक असतात. त्यामुळे मधूमेहींसाठी पीच फळाचा आस्वाद फायदेशीर ठरतो. 

पपई- 

यामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स अधिक असतात तर साखरेचे प्रमाण कमी असते. काही अभ्यासानुसार, पपईच्या सेवनामुळे टाईप 2 डाएबिटीसमध्ये इन्सुलिन सिक्रिशनचे कार्य सुधारायला मदत होते.  

आवळा - 

यामधील  polyphenols घटक अ‍ॅन्टीऑक्सिडंट क्षमता सुधारतात. यामुळे रक्तातील साखरेचे ऑक्सिडायझेशन रोखण्यास मदत होते तसेच इन्सुलिनच्या कार्यामधील अडथळाही कमी होतो. आवळ्याच्या सेवनाने इन्सुलिनचे कार्य सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. 

बेरीज - 

ब्लु बेरीजमधील Anthocyanin घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. तसेच इन्सुलिनच्या कार्याला चालना मिळते. भारतीय ब्लॅकबेरीजच्या बियांमधील  glycoside घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. 

चेरी - 

आकारात लहान असणारे हे फळं ग्ल्यासमिक इंडेक्सच्या बाबतीतही लहानसे असते. चेरीत ग्ल्यायस्मिक इंडेक्स व्हॅल्यू केवळ  29 असते. चेरीत अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक असतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. 

सायट्रस  फ्रुट्स - 

संत्र, लिंबू, ग्रेपफ्रुट यासारखी सायट्र्स, आंबट फळं बाजारात मुबलक उपलब्ध असतात. याचे सेवन मधूमेहींना फायदेशिर ठरते. या फळांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील बॉडी  फॅट्सचे ब्रेकडाऊन करतात, इन्सुलिनच्या कार्याला चालना देतात तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण सुधारतात. ग्रेपफूटमुळे शरिरातील इन्सुलिन सेन्सिटीव्हिटी सुधारते.