हॅपी हार्मोन्स वाढवण्याचे काही नैसर्गिक उपाय

  तुम्ही उदास आहात का? मग serotonin च्या अगदी थोड्या प्रमाणामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. कारण या केमिकलमुळे चिंता कमी होवून मूड चांगला होण्यास मदत होते. भूकेवर नियंत्रित येतं आणि आनंदी राहण्याच उत्तेजन मिळतं. म्हणून जर तुम्हाला उदास वाटत असेल तर मेंदूत हॅपी केमिकल स्त्रवण्यासाठी या ट्रिक्स नक्की ट्राय करा.

Updated: Jan 8, 2018, 08:42 PM IST
हॅपी हार्मोन्स वाढवण्याचे काही नैसर्गिक उपाय   title=

 मुंबई :  तुम्ही उदास आहात का? मग serotonin च्या अगदी थोड्या प्रमाणामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. कारण या केमिकलमुळे चिंता कमी होवून मूड चांगला होण्यास मदत होते. भूकेवर नियंत्रित येतं आणि आनंदी राहण्याच उत्तेजन मिळतं. म्हणून जर तुम्हाला उदास वाटत असेल तर मेंदूत हॅपी केमिकल स्त्रवण्यासाठी या ट्रिक्स नक्की ट्राय करा.

 मसाज

 मसाज घेतल्याने खूप रिलॅक्स वाटतं. त्यामुळे प्रत्येकालाच मसाज घेणे आवडते. तसंच मसाज घेतल्याने serotonin च्या वाढीस चालना मिळते व त्यामुळे दुःख दूर होऊन तुम्हाला प्रसन्न वाटतं, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

दूध 

दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुधात असलेल्या α-lactalbumin मुळे serotonin ची निर्मिती होते. α-lactalbumin युक्त कोणत्याही आहाराने तुमचा मूड सुधारण्यास मदत होते.

झोप 

अपुरी झोप घेऊ नका. अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की झोपेचा आणि serotonin चा संबंध असतो. त्यामुळे मूड चांगला ठेवण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप घ्या.

हळद 

हळदीमध्ये असलेल्या Curcumin यात अँटीडिप्रेसन्ट गुणधर्म असतात. म्हणून कोमट दुधात हळद घालून घेतल्याने चटकन मूड सुधारतो.

काळामिरी 

काळीमिरी मध्ये Piperin नावाचे अॅक्टिव्ह कंपाऊंड असते. ते serotonin च्या निर्मितीस अडथळा आणणारे एंझ्याइम्स ब्रेक करते.

व्यायाम  

serotonin स्त्रवण्याचा उत्तम उपाय म्हणजे व्यायाम करणे. म्ह्णून नियमित व्यायाम करा आणि प्रसन्न रहा.