हे ७ पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे टाळा!

अन्न शिल्लक राहिले की आपण ते फ्रिजच्या स्वाधीन करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करुन त्याचा आस्वाद घेतो.

Updated: Jun 14, 2018, 08:22 AM IST
हे ७ पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे टाळा! title=

मुंबई : अन्न शिल्लक राहिले की आपण ते फ्रिजच्या स्वाधीन करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करुन त्याचा आस्वाद घेतो. अनेक घरात स्त्रिया एकाचवेळी स्वयंपाक करतात आणि दोन्ही वेळेस खातात. पण तुम्हाला कदाचित याचा अंदाज नाही की, अन्न अधिक वेळा गरम केल्यास त्यातील पोषकतत्त्वांच्या कंपोजिशन्समध्ये बदल होतात आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. कामाच्या धावपळीत नेहमीच फ्रेश अन्न शिजवणे शक्य नसले तरी हे काही पदार्थ पुन्हा गरम करणे टाळा. कारण ते आरोग्यास नुकसानकारक ठरते. पाहुया कोणते आहेत ते पदार्थ...

चिकन

फ्रिजमध्ये ठेवलेले चिकन पुन्हा गरम केल्यास त्यातील प्रोटीन कंपोजिशन पूर्णपणे बदलून जाते. त्यामुळे पचनतंत्र बिघडते. 

बटाटा

बटाटा उकडल्यानंतर रुम टेम्परेचरवर ते थंड होऊ द्या. गरम असल्याने त्यात बॉटुलिज्म नावाच्या बॅक्टेरीयाची उत्पती होते. थंड झाल्यानंतर पुन्हा गरम केल्याने त्यातील बॅक्टेरीया जिवंत राहतात. त्यामुळे बटाटे उकडल्यानंतर थंड होण्यासाठी थेट फ्रिजमध्ये ठेवा.

पालक

पालक दोनदा गरम करुन खाल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. पालकातील असलेले नायट्रेट दोनदा गरम केल्याने त्याचे अशा तत्त्वात बदल होते की ज्यामुळे कॅन्सर होण्याची संभावना अधिक असते. म्हणून पालक शिजवल्यानंतर लगेचच खा.

अंड

अंड पुन्हा गरम करुन खाणे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अंडे उष्ण असते. अशातच ते गरम केल्याने त्यातील प्रोटीनचे विषारी घटकात रुपांतर होते. त्यामुळे पोटासंबंधित अनेक समस्या होण्याचा धोका असतो.

भात

तांदूळ तुम्ही कसा साठवून ठेवता, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. खरंतर कच्चा तांदळात जीवाणू असतात. जे तांदूळ शिजल्यानंतरही जिवंत राहतात. अशावेळी भात शिजल्यानंतर तो रुम टेम्परेचरवर ठेवल्यास हे जिवाणू बदलतात. आणि पुन्हा गरम केल्याने ते नुकसानदायक ठरते. त्यामुळे भात हवा तेवढाच करा. एकदाच भरपूर करून पुन्हा पुन्हा खाणे टाळा.

मशरुम

मशरुममध्ये प्रोटीन्स असतात. पुन्हा पुन्हा गरम केल्याने ते कमी होतात. त्यामुळे शिजवल्यानंतर ताजे असतानाच त्याचा आस्वाद घ्या. पुन्हा गरम करुन खाल्याने पोट खराब होऊ शकते.

बीट

बीट पुन्हा गरम केल्याने त्यातील नायट्रेट नष्ट होतात. त्यामुळे पुन्हा गरम करणे टाळा. कधी बिटाची भाजी अधिक प्रमाणात झाल्यास ती फ्रिजमध्ये ठेवा. खाण्याच्या वेळेपूर्वी काही तास आधी बाहेर काढा आणि गरम न करता खा.