कोथिंबीर अधिक काळ टिकवण्यासाठी सोपा उपाय!

ताज्या, हिरव्यागार भाज्या प्रत्येकालाच आवडतात. 

Updated: Jun 14, 2018, 07:47 AM IST
कोथिंबीर अधिक काळ टिकवण्यासाठी सोपा उपाय! title=

मुंबई : ताज्या, हिरव्यागार भाज्या प्रत्येकालाच आवडतात. त्या बघायलाही खूप छान दिसतात. पदार्थाची चव, स्वाद आणि एकंदर लूक मस्त करण्यासाठी वापरली जाणारी कोथिंबीर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. पण ती अधिक काळ टिकवणे काहीसे कठीण असते. अगदी फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही काही दिवसात कोथिंबीर खराब होते. तर जाणून घेऊया कोथिंबीर दीर्घ काळ टिकवण्याचे सोपे उपाय....

# सर्वात आधी कोथिंबीरीचे देठ कापून टाका. त्यानंतर एका भांड्यात थोडे पाणी घ्या आणि त्यात चमचाभर हळद घाला. त्यात कोथिंबीर ३० मिनिटे भिजत ठेवा.

# त्यानंतर कोथिंबीर बाहेर काढून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मग सुकवा. आता एका टिशू पेपरने ती स्वच्छ करा. आता एका एअरटाईड कंटेनरमध्ये टिशू पेपर घालून त्यावर कोथिंबीर पसरवून ठेवा.

# त्यानंतर वरुनही टिशू पेपर लावून डबा बंद करा. यात पाण्याचा अंश राहणार नाही याची खबरदारी घ्या. मग एअरटाईड कंटेनरचे झाकण बंद करुन फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्याने कोथिंबीर दीर्घ काळ टिकेल.