या '5' पदार्थांनी कमी करा कॅन्सरचा धोका

कॅन्सर हा दुर्धर आजार जितका भयंकर आहे तितकेच त्याचे उपचारही वेदनादायी आहेत. 

Updated: Jul 10, 2018, 09:57 PM IST
या '5' पदार्थांनी कमी करा कॅन्सरचा धोका  title=

मुंबई : कॅन्सर हा दुर्धर आजार जितका भयंकर आहे तितकेच त्याचे उपचारही वेदनादायी आहेत. त्यामुळे कॅन्सरचा सामना करण्यासाठी वेळीच निदान होणं गरजेचे आहे. आहारावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठीदेखील आहारात सकारत्मक बदल करणं आवश्यक आहे. आहारात काही पदार्थांचा समावेश केल्याने कॅन्सरचा धोका काही प्रमाणात कमी करण्यात मदत होऊ शकते.  High Grade Cancer चा सामना करणार्‍यांचा आहार कसा असावा?

आहारात कोणत्या भाज्यांचा कराल समावेश? 

फळभाज्या - 

आतड्यांच्या कॅन्सरचा सामना करण्यासाठी आहारात मुबलक फायबर्स घटकांचा समावेश करणं गरजेचे आहे. फळभाज्यांचा आहारात समावेश करा. यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.  

सिमला मिरची - 

सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, ई, बी आणि सी घटक मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये कॅन्सरचा सामना करण्याचे गुणधर्म असतात. कॅप्सेईसिन घटक वेदनाशामक आहे. सोबतच सिमला मिरचीमधील सल्फर घटक कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात. 

कोबी - 

कोबीमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे कॅन्सरचा सामना करणं सुकर होते.  

ब्रोकोली -  

ब्रोकोलीमध्ये कॅन्सरशी सामना करणारे फाइटोकेमिकल्स घटक मुबलक असतात. सोबतच आयर्न, अ‍ॅन्टीऑक्सिडंट, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, व्हिटॅमिन ए आणि सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. 

सफरचंद -  

सफरचंदामध्ये कॅन्सरशी सामना करण्यासाठी आवश्यक फायबर घटक असतात. सोबतच अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असल्याने कॅन्सरशी सामना करणं सुकर होते.  सावधान ! नेहमीच्या सवयीतील या '5' गोष्टी नकळत वाढवतात कॅन्सरचा धोका