जीवनशैलीमध्ये 'हे' पाच बदल केल्यास डायबेटीसमुळे कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती वाढण्यास होईल मदत

 डायबेटीसमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि संसर्ग होण्याचा धोकाही वाढू शकतो. आहारात आणि जीवनशैलीत काही बदल केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. याशिवाय, प्रतिकारशक्ती वाढून संसर्गांचा धोका कमी होण्यासही मदत होते.

Updated: Nov 14, 2022, 06:08 PM IST
जीवनशैलीमध्ये 'हे' पाच बदल केल्यास डायबेटीसमुळे कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती वाढण्यास होईल मदत title=

DiabetesMeinImmunityZaroori : डायबेटीस अर्थात मधुमेह असल्यास किंवा त्याच्या सीमारेषेवर असल्यास आपल्या रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरना वारंवार भेटून सल्ला घ्यावा लागतो. औषधं, रक्तातल्या साखरेच्या पातळीचं दैनंदिन निरीक्षण आणि आहारात काही बदल करणं अशा काही गोष्टींचा समावेश उपचार प्रक्रियेमध्ये होतो. डायबेटीसमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि संसर्ग होण्याचा धोकाही वाढू शकतो. आहारात आणि जीवनशैलीत काही बदल केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. याशिवाय, प्रतिकारशक्ती वाढून संसर्गांचा धोका कमी होण्यासही मदत होते.

डायबेटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या दिनचर्येमध्ये काय सुधारणा कराव्यात, याबाबत या लेखातून माहिती देण्यात आली आहे :

मद्यपान आणि धूम्रपान सोडा

धूम्रपान आणि मद्यपान केल्याने प्रतिकारशक्तीवर तीव्र परिणाम होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला डायबेटीस असतो तेव्हा या गोष्टींचे शरीरावर होत असलेले परिणाम अधिक स्पष्टपणे दिसतात. धूम्रपान आणि मद्यपान या दोन्ही कृती रक्ताभिसरण प्रक्रियेत व्यत्यय आणत असल्याचं आढळलं आहे. या कृतींमुळे डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित करणं कठीण होऊ शकतं. यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

सतत मद्यपान किंवा धूम्रपान करत असलात, तर त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. या गोष्टींचं प्रमाण हळूहळू कमी करून शेवटी त्या पूर्णपणे सोडून दिल्या पाहिजेत. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्लादेखील घेऊ शकता. धूम्रपान आणि मद्यपान सोडण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि चिकाटी सर्वांत जास्त उपयुक्त ठरेल.

संतुलित आहार घ्या

प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, आयर्न इत्यादी पोषक तत्त्वांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला संतुलित आहार घेतला पाहिजे. संतुलित आहार हा डायबेटीस नियंत्रणात ठेवण्याचा आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. खाण्याच्या वेळा पाळल्या पाहिजेत आणि जेवढं शक्य असेल तेवढं आपल्या आहारावर योग्य नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पचनासाठी जड वाटणार्‍या स्नॅक्सऐवजी हलके स्नॅक्स घ्या. दोन वेळेचं जेवण आणि डॉक्टर्सनी दिलेली औषधं वेळेवर घेतली पाहिजेत.

डाबर च्यवनप्रकाशचं दररोज सेवन करा

तुमच्या दिनचर्येत फारसा बदल न करता तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्य पूरक आहार (हेल्थ सप्लिमेंट्स) हा एक प्रभावी मार्ग आहे. डाबर

च्यवनप्रकाश हे एक आयुर्वेदिक हेल्थ सप्लिमेंट आहे, ज्यामुळे डायबेटीस असलेल्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती वाढण्यात मदत होऊ शकते.

डाबर च्यवनप्रकाश हे एक वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन केलेलं उत्पादन आहे. त्यामध्ये अनेक चाचण्या केलेल्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या औषधी वनस्पती TNF-अल्फा, NK सेल्स आणि स्प्लेनोसाइट्स यांसारख्या रोगप्रतिकारक घटकांच्या अ‍ॅक्टिव्हिटीजना उत्तेजित करून शरीराच्या रोगप्रतिकारक कार्याला चालना देण्याचं काम करतात.

डाबर च्यवनप्राशमुळे शरीरातली ऊर्जा पातळी आणि जीवनाची गुणवत्ता वाढते. म्हणून, आहार आणि जीवनशैलीत बदल करण्यासोबतच डाबर च्यवनप्रकाशचा तुमच्या दैनंदिन रूटीनमध्ये समाविष्ट केला पाहिजे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि संसर्गाच्या जोखमीशी लढण्यास मदत होऊ शकते.

 

स्किन केअरसाठी वेळ द्या

डायबेटीसमुळे त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. डायबेटीस असलेल्या काही व्यक्तींच्या हातापायांना मुंग्या येतात किंवा हातपाय सुन्न होतात. एखाद्याला वेदनांची लवकर जाणीव होत नाही. म्हणजेच अशा व्यक्तीला डायबेटीस नसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत वेदनांची जाणीव उशिरा होते. कोणत्याही

वेदना किंवा जखमा बऱ्या होण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा बरं होण्याची प्रक्रिया कठीण होऊ शकते.

दररोज मॉइश्चरायझर वापरणं, पाय घासणं, शरीराचं काळजीपूर्वक निरीक्षण करणं आणि दुखापत झाल्यास लगेच डॉक्टरकडे जाणं अशा काही गोष्टींचा अवलंब करून डायबेटीस असलेल्या व्यक्ती आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतात. असं केल्यानं डायबेटीस आणि संसर्ग नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

शरीर डिटॉक्स करा

ग्रीन ज्यूस, दालचिनी घातलेलं पाणी, तुळस घातलेलं पाणी इत्यादी डिटॉक्स हायड्रेशन रेसिपीजचा अवलंब करणं, हा प्रतिकारशक्ती सुधारण्याचा उत्तम मार्ग ठरू शकतो. डिटॉक्सिफिकेशनसाठी भाज्या, नट्स, सीड्स इत्यादी प्रकारचे कच्चे किंवा प्रक्रिया न केलेले अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत. डिटॉक्सिफिकेशन शरीरातले विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी, रक्तातली साखरेची पातळी योग्य

राखण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामुळे संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो.

या डिटॉक्सिफिकेशन व्यतिरिक्त तुम्ही काही भौतिक गोष्टींपासूनही लांब राहिलं पाहिजे. सोशल मीडियाचा वापर कमी करणं, व्यग्र शेड्यूलमधून ब्रेक घेणं इत्यादी गोष्टीदेखील जीवनशैली सुधारण्यासाठी आणि एकंदर शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी खूप मदत करतात.

अनुमान

डायबेटिक व्यक्ती त्यांचं जीवन अधिक सुखकर करण्यासाठी अनेक आरोग्यदायी उपाय करू शकतात. वर नमूद केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त, औषधं वेळेवर घेणं, साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खाणं, नियमित तपासणी करणं, दिनचर्येत डाबर च्यवनप्रकाशसारख्या आरोग्यपूरक पदार्थांचा समावेश करणं, हायड्रेटेड राहणं आणि जीवनशैलीतले इतर बदल केल्यास डायेबटीसशी सहज सामना करता येऊ शकतो. शिवाय, दैनंदिन आजारांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीही योग्य प्रकारे वाढवता येते.

(डिस्क्लेमर : च्यवनप्रकाश हे एक आयुर्वेदिक औषध आहे. डायबेटीसवर उपचार करण्यासाठी किंवा तो बरा करण्यासाठी त्याची निर्मिती केलेली नाही. वापर कसा करावा यासाठी लेबल पाहा. लेखातला संसर्ग आणि आजारांचा उल्लेख खोकला आणि सर्दीसारख्या सर्वसामान्य आजारांशी संबंधित आहे. या लेखातला कंटेंट केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे आणि त्याचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून वापर करू नये.)

Disclaimer : Above mentioned article is a featured content. This article does not have journalistic/editorial involvement of IDPL, and IDPL claims no responsibility whatsoever.