Fenugreek Seeds Benefits: हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल ते मधुमेह सारख्या अनेक समस्यांना ही वस्तू ठेवते नियंत्रित

Fenugreek Seeds Benefits: हिवाळा सुरु झाला की आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मेथीचे दाणे अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून कसे काम करतात जाणून घ्या.

Updated: Nov 28, 2022, 10:49 AM IST
Fenugreek Seeds Benefits: हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल ते मधुमेह सारख्या अनेक समस्यांना ही वस्तू ठेवते नियंत्रित title=

Winter Health Tips For Diabetes and Bad Cholesterol : हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे शरीराला उबदार ठेवण्यासाठी काही उपाय केले पाहिजे. हिवाळ्यात सांधेदुखी, हृदयरोग सारख्या रुग्णांना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे हिवाळ्यात अंकुरलेली मेथी खाणे हा एक प्रभावी उपाय आहे. आयुर्वेदात मेथीचे दाणे (fenugreek seeds) अनेक रोगांवर प्रभावी मानले जाते. ( Benifits of fenugreek seeds )

अंकुरलेली मेथी ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत तर करतेच पण इतर समस्यांवर देखील रामबाण उपाय म्हणून काम करते. मेथीमुळे रक्त गोठण्याची समस्या कमी होते. तसेच युरिक अॅसिडही नियंत्रित ठेवते.

ज्याप्रमाणे मोड आलेले हरभरे, हिरवे मूग अधिक पौष्टिक असतात तसेच मेथीचा औषधी गुणही अंकुर फुटल्यानंतर वाढतो. अंकुरित मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे पोटातील गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टमला बरे करण्यास मदत करतात. अंकुरलेल्या मेथीच्या दाण्यांमध्ये सॅपोनिन नावाचे तत्व असते, जे आतड्यांपासून पोटापर्यंत निरोगी ठेवते.

मधुमेह नियंत्रणात ठेवते

मोड आलेली मेथी साखरेची पातळी कमी करण्याचं काम करते. यामुळे अनियंत्रित मधुमेह ताबडतोब नियंत्रणात येतो. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि ही प्रक्रिया 5 दिवस पुन्हा करा आणि मेथीला मोड आल्यानंतर ती कच्चे किंवा सॅलडमध्ये काळी मिरी किंवा मीठ घालून खावू शकता.

हाय कोलेस्ट्रॉल

जर तुमच्या रक्तात कोलेस्टेरॉल जास्त असेल तर रोज सकाळी मूठभर मोड आलेली मेथी खाणे सुरू करा. त्यात असलेले फिनॉल्स, फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स आणि टॅनिनसारखे फोटोकेमिकल्स पाहिल्यावर, रक्तवाहिन्यांमधील अडथळा, सूज आणि कडकपणा कमी होऊ लागतो.

वजन कमी करण्यास मदत

मोड आलेल्या मेथीमध्ये पोषक घटकांचे प्रमाण वाढते. तुमचे स्नायू, सांधे चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी याचे सेवन करू शकता. मेथी शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा, जीवनसत्त्वांचा पुरेसा पुरवठा करते.

प्रतिकारशक्ती वाढवते

मोड आलेल्या मेथीमध्ये फिनॉल्स, फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स आणि टॅनिन सारखी फोटोकेमिकल्स असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. मेथीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे संपूर्ण आरोग्याची काळजी घेतात. याच्या नियमित सेवनाने तुमची त्वचा आणि केस चांगले राहते.

हृदयाचे आरोग्य

पोटॅशियमचा एक उत्कृष्ट स्रोत म्हणजे मेथी. ती रक्तदाब संतुलित करते, कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तातील चरबीचे साठे प्रभावीपणे नियंत्रित करते; त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

चयापचय सुधारते

भिजवून खाल्ल्याने मेथी मऊ बनते. यामुळेच ते पचायला सोपे आणि जलद असते. हे स्वादुपिंडातील बीटा पेशींचे उत्पादन सुधारते. मेथीच्या योग्य प्रमाणात सेवन केल्याने आम्लपित्त, पोट फुगणे, अतिसार, अपचन या समस्यांपासून बचाव होतो.