Health care : काही आजार असे असतात ज्यांची लक्षणं लवकर कळून येत नाहीत. ज्यामुळे साधारण वाटणारे आजार पुढे गंभीर होतात, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. काहीही होत नाही म्हणून आपण आरोग्यावर दुर्लक्ष करतो, पण दुर्लक्ष केल्यामुळे कालांतराने आजार गंभीर रुप घेतात आणि याच कारणांमुळे शरीराचे काही अवयव आपल्याला गमवावे लागतात. असंच काही झालं आहे एका महिलेसोबत. तर आज जाणून घेवू या महिलेसोबत नक्की काय झालं.
युकेमध्ये राहणाऱ्या किम स्मिथ नावाच्या महिलेला 2017 साली सेप्सिस या गंभीर आजाराने वेढलं होतं. ज्यामुळे महिलेले आपले चार अवयव गमवावे लागले. ज्यानंतर डॉक्टरांनी महिलेचं डबल-हँड ट्रान्सप्लांट केलं आहे. किमने कधी विचारही केला नव्हता की, किरकोळ वाटणारी लक्षणं पुढे जाऊन गंभीर आजारचं रुप धारण करतील. (causes of sepsis)
किमच्या या आजाराची सुरुवात झाली स्पेनमधून. काही वर्षांपूर्वी किम सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी स्पेनला गेली होती. जेथे तिला युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन (Urinary tract infection) नंतर सेप्सिस या गंभीर आजाराचा सामना करावा लागला. (sepsis treatment)
एका रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी किमला 9 महिने अस्थाई कोमामध्ये ठेवलं होतं. UTI नंतर किमच्या शरीरात सेप्सिस पसरल्यामुळे तिचे पाय आणि हात कापावे लागले. गंभीर आजाराची लागण होण्यापूर्वी किम एक हेअर ड्रेसर म्हणून काम करत होती. (sepsis treatment)
सेप्सिसची लागण झाल्यानंतर किमला तिचे चार अवयव गमवावे लागले. त्यानंतर डबल-हँड ट्रान्सप्लांट करण्यासाठी किमला प्रतीक्षा करावी लागली. लीड्स जनरल इन्फर्मरी (Leeds General Infirmary) अशा काही रुग्णालयांपैकी एक आहे जिथे डबल-हँड ट्रान्सप्लांट संपूर्ण प्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे केली जाते.
किमने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, 'मला माझे अवयव गमवावे लागणार याची खात्री होती. जेव्हा डॉक्टरांनी मला याबद्दल सांगितलं तेव्हा मी त्यांना 'होय, ठीक आहे' एवढंच म्हणाली. कारण मला माहित होतं, माझे काही अवयव पूर्णपणे खराब झाले आहेत आणि आता काहीही करता येणार नाही.'
'पण डबल-हँड ट्रान्सप्लांटनंतर मी स्वयंपाकासोबतच इतर कामं देखील करु शकेल.' असा विश्वास किमने यावेळी व्यक्त केला. CDC (Centers for Disease Control and Prevention) नुसार जगभरात सुमारे 17 लाख लोक सेप्सिसने प्रभावित आहेत.
शरीरात कसा वाढू लागतो सेप्सिस?
शरीरात संसर्ग झाल्यामुळे सेप्सिस होतो. जेव्हा हा सेप्सिस (sepsis signs) शरीरात वाढू लागतो, तेव्हा तेव्हा शरीरातील अनेक अवयव निकामी होतात. ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याची देखील शक्यता असते. (what is sepsis)
सेप्सिस आजारावर योग्य उपचार केले नाहीतर मृत्यू होणाचा धोका असतो. फुफ्फुस, मूत्रमार्ग, त्वचा आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या संसर्गामुळे सेप्सिसचा धोका वाढतो. जर या सर्व संक्रमणांवर वेळेवर उपचार केले गेले नाहीत तर सेप्सिस आपल्या शरीरात वेगाने पसरू लागते ज्यामुळे अवयव निकामी होणे आणि मृत्यू होऊ शकतो.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या मते, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची समस्या घट्ट कपडे घालणं, बाथरूमच्या वाईट सवयी, शारीरिक संबंधानंतरच्या सवयी आणि डिहायड्रेशनमुळे होतं.