Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. कतरिना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. कतरिनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिच्या फॅनपेजवरून देखील शेअर करण्यात येतात. मात्र, आता तिचं चर्चेत येण्याचं कारण एक दुसरा व्हिडीओ आहे. कतरिना ही नुकतीच एका नवरात्रीच्या कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी कतरिना भारतीय पारंपारिक वेषात दिसली. तिच्या लूक किंवा साडी पेक्षा जास्त चर्चा ही तिच्या हातावर असलेल्या एक काळ्या पॅचनं वेधलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या आरोग्याची चिंता वाटू लागली आहे.
कतरिनाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. कतरिनानं फिकट नारंगी रंगाची साडी नेसली आहे. तिच्या या लूकची नेटकरी स्तुती करत आहेत. तर या व्हिडीओत दिसतंय की कतरिनाला पाहताच तिचे चाहते तिच्यासोबत हात मिळवण्यासाठी फोटो काढण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण अनेक लोकांचे लक्ष हे तिच्या हातावर असलेल्या एका काळ्या रंगाच्या पॅचनं वेधलं आहे. अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
कतरिनाच्या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'ती ठीक आहे?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हा तर मेडिकल पॅचसारखा दिसतोय.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'कतरिना ही डायबिटीक आहे?' हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, कतरिना कैफच्या हातावर असलेला हा काळा पॅच डायबिटीज पॅच असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. या पॅचचा वापर हा ब्लड शुगर लेव्हल मॉनिटर करण्यासाठी करतात. या पॅचला ग्लूकोज मॉनिटर म्हणून ओळखतात. हा पॅच डायबिटीजची समस्या असलेले लोक घालतात. या डिव्हाइसमुळे बोटावर सुईनं टोचायची गरज भासत नाही आणि तरीही शुगर ट्रॅक करण्यास मदत होते.
हेही वाचा : 'ताल जपायचा की तोल...', प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'चा ठसकेबास ट्रेलर प्रदर्शित
दरम्यान, अजून यावर कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही की कतरिनाला खरंच डायबिटीज आहे. पण काही नेटकऱ्यांनी कतरिनाच्या या पॅचचा संबंध इतर गोष्टींशी जोडला आहे. एका नेटकऱ्याचं म्हणणं आहे की 'हा अल्ट्राह्युमन सारखं काही फिटनेस ट्रॅकर होऊ शकतो. जी ब्लड शुगर, हृदयाची श्वास घेण्याची गती आणि इतकंच नाही तर झोपेचा पॅटर्नला देखील मॉनिटर करतं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'डायबिटीज पॅच सर्वसाधारणपणे टाइप-1 डायबिटीज आणि एडवांस्ड टाइप-2 डायबिटीज असलेली व्यक्ती शुगर लेव्हलला सतत मॉनिटर करण्यासाठी घालतात.'