हार्ट अटॅकची भीती वाटते का? अजिबात घाबरु नका ही ८ सुपरफुडस आहेत ना!

असेच काही पदार्थ आहेत जे तुमच्या धमन्यांना आतील बाजूने निरोगी ठेवून हृदयाला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

Updated: Dec 23, 2021, 04:03 PM IST
हार्ट अटॅकची भीती वाटते का? अजिबात घाबरु नका ही ८ सुपरफुडस आहेत ना! title=

मुंबई : हार्ट अटॅक हा जगातील सर्वात मोठा जीवघेणा आजार मानला जातो. Centers for Disease Control and Prevention च्या माहितीनुसार, चार जणांपैकी एका व्यक्तीच्या मृत्यूचं कारण हे हार्ट अटॅक असतं.

मुळात हार्ट अटॅक येण्याचं कारण म्हणजे धमन्यांमध्ये प्लॅमा होऊन आतील बाजूने धमनी अरूंद होते. परिणामी रक्त योग्यरित्या प्रवाहित होण्यास अडथळा येतो आणि हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.

मात्र धमन्या सुरक्षित राहण्यासाठी काही खाद्यपदार्थ फायदेशीर ठरतात. असेच काही पदार्थ आहेत जे तुमच्या धमन्यांना आतील बाजूने निरोगी ठेवून हृदयाला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

अळशी

अळशीचे मानवी शरीराला अनेक फायदे होतात. धमन्यांसाठी हे एक चांगलं सूपरफूड मानलं जातं. अळशीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते त्याचसोबत ब्लड प्रेशर योग्य राहतं. यामुळे धमन्यांमध्ये रक्तांच्या गुठळ्या होत नाहीत. 

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात कॅटेचिन असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. एका संशोधनानुसार असं लक्षात आलं होतं की, ज्य़ा व्यक्ती नियमितपणे ग्रीन टीचं सेवन करतात त्यांचं हृदयाची संपूर्ण आरोग्य प्रणाली निरोगी राहते. त्याचप्रमाणे ग्रीन टी पिणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा दोका 20 टक्क्यांनी कमी असतो.

डाळिंब

डाळिंबामध्यये phytochemicals चं प्रमाण असतं. यामध्ये अँटीऑक्सिडंट असंत जे रक्तवाहिन्याच्या अस्तरांचं नुकसान होऊ देत नाही. डाळिंबाचा रस शरीरातील nitric oxide उत्तेजित करतं ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियम असतं. ज्या धमन्यांचं नुकसान होण्यापासून संरक्षण होतं. त्याचप्रमाणे यामध्ये असलेल्या फायबरमुळे कोल्स्ट्रॉलची पातळी चांगली राहण्यास मदत होते.

हळद

भारतीय मसाल्यामध्ये हळद ही आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी मानली जाते. हळदीचा आहारात समावेश केल्याने धमन्यांचं नुकसान होत नाही आणि रक्ताच्या गुठळ्याही होत नाहीत.

दालचिनी

भारतीय मसाल्यातील अजून एक पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो तो म्हणजे दालचिनी. दालचिनीमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं आणि धमन्यांच्या आत चरबी जमा होऊ देत नाही. परिणामी हार्ट अटॅकचा धोका टळतो.

कॅनबेरीज

कॅनबेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट असतं ज्यामुळे दोन्ही कोलेस्ट्रॉलची पातळी समान राखण्यास मदत करते. तसंच क्रॅनबेरी ज्यूसचे नियमित सेवन केल्याने तुमच्या हृदयविकाराचा एकूण धोका 40% कमी होण्यास मदत होते.

एवोकॅडो

तुमच्या बर्गर किंवा सँडविचमध्ये मेयोनिसच्या जागी एवोकॅडो पर्याय म्हणून वापरा. यापूर्वी केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की एवोकॅडोचे दररोज सेवन केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल (एलडीएल कमी आणि एचडीएल) सुधारतं. एचडीएल कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांना अडथळे दूर ठेवण्यास मदत करते.