तुम्हाला रात्री हाता-पायाला खाज सुटते? यामागे असू शकते 'ही' मोठी समस्या

जर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे एका आजाराचं लक्षण असू शकतं.

Updated: Aug 2, 2022, 04:41 PM IST
तुम्हाला रात्री हाता-पायाला खाज सुटते? यामागे असू शकते 'ही' मोठी समस्या title=
fatty liver symptoms hands and leg itching more signs skin changes health tips in marathi

Fatty Liver - रात्री झोपताना अनेकांना रात्री पायाला आणि हाताला जळजळ किंवा खाज सुटते. जर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे एका आजाराचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर तुम्हाला लिव्हरसंबंधी आजार असण्याची शक्यता आहे. लिव्हर (Liver) हा आपल्या शरीरातील अविभाज्य अंग आहे. आपण जे खातो त्यातील पोषक घटक गरजेनुसार शरीराच्या इतर भागात पोहोचवण्याचे काम लिव्हर करत असतो. त्यामुळे आपलं लिव्हर हे निरोगी असणे गरजेचे आहे. आजकाल जवळपास 50 टक्के लोकांमध्ये लिव्हरची समस्या वाढल्याचं डॉक्टर सांगतात. बदलेली जीवनशैलीमुळे अनेकांना फॅटी लिव्हर  (Fatty Liver) ची समस्या जाणवते. ही समस्या जरी सामान्य असली तर यातून अनेक गंभीर आजार वाढण्याची भीती आहे. 

आता तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या आहे हे कसं कळणार. तर असे काही लक्षणं आहेत जे तुमच्या शरीरात जाणवता. भूक न लागणे, अन्न नीट न पचणे, लिव्हरवर सूज आणि रात्रीच्या वेळी हात आणि पायांना खाज सुटणे. जाणून घेऊयात इतर लक्षणांबद्दल 

हात आणि पायाला खाज सुटणे (Itching and Irritation In hands and Leg)

रात्रीच्या वेळी जर हात-पायांमध्ये खाज सुटली आणि लालसरपणा जाणल्यास तुमच्या शरीरात हार्मोन्सचं असंतुलन झालं आहे. अनेक वेळा तळहातांची खाज रात्री खूप वाढते. अगदी हातापायाला जळजळ होते आणि सूजही येते. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

फॅटी लिव्हरची कारणं आणि लक्षणं  (Symptoms and causes of Fatty Liver) 

जर तुम्हाला वाटत असेल जे लोकं अल्कोहोल घेतात त्यांना फॅटी लिव्हरची समस्या जाणवते तर असं नाही. नॉन अल्कोहोलिक लोकांमध्यही ही समस्या होऊ शकते. जेव्हा लिव्हरमध्ये नको असलेली अतिरिक्त चरबी जमा होते त्यावेळी आपल्याला फॅटी लिव्हरची समस्या जाणवते. खाण्याच्या चुकीची सवय आणि निष्काळजीपणा या सगळ्याला कारणीभूत असतो. 

त्वचेत बदल होणे (Changes in Skin)

जेव्हा शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढते तेव्हा त्वचेवर छोट्य छोट्या कोळीच्या जाळ्यासारखे पेशी दिसू लागतात. याला डॉक्टरी भाषेत स्पायडर अँजिओमास असं म्हणतात. हे देखील लिव्हर नीट असल्याचे एक लक्षण आहे. जर तुमच्या शरीरावर निळ्या रंगाचे पुरळ दिल्यास याकडे दुर्लक्ष करु नका. 

'या' गोष्टी टाळा (How to Save from Fatty Liver)

1. वजन नियंत्रणात ठेवा
2. जास्त कॅलरीचे पदार्थ खाऊ नका
3. आपल्या आहाराची काळजी घ्या
4. जास्त सुगंध असलेला साबण वापरू नका
5. कोमट पाण्याने आंघोळ करा 
6. खाज येत असलेल्या जागी थंड पाण्याने धुवा
7. सैल फिटिंगचे कपडे घाला

   (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)