तांब्याच्या भांड्यातलं पाणी असतं आरोग्यदायी! यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घ्या

तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवण्यामागे वैज्ञानिक कारण असून आरोग्यदायी आहे.

Updated: Aug 2, 2022, 04:07 PM IST
तांब्याच्या भांड्यातलं पाणी असतं आरोग्यदायी! यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घ्या title=

Copper Vessel Water Benefits: घरातील वयस्कर माणसं कायम तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचा सल्ला देतात. अनेकदा हा सल्ला आपण टाळतो. पण तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवण्यामागे वैज्ञानिक कारण असून आरोग्यदायी आहे. तांब्यामध्ये पाण्यातील बॅक्टीरिया आणि दूषित तत्त्व नष्ट करण्याची शक्ती असते. त्याचबरोबर पाण्यात तांब्याचे तत्त्व समाविष्ट होतात. पाणी प्यायल्यानंतर तांब्यातील तत्त्व शरीरात प्रवेश करतात. यामुळे शरीरातील हानिकारक तत्त्व नष्ट करते. त्याचबरोबर विविध आजारांपासून संरक्षण मिळते. चला तर मग जाणून घेऊयात तांब्याच्या भांड्यामधून पाणी पिण्याचे फायदे

1. सांधेदुखीपासून आराम: तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे वेदना कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. यामुळेच रोज तांब्याचे पाणी प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.

2. पोटातील संसर्ग दूर होईल: तांबे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पोट साफ करते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने अल्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो. हे मूत्रपिंड आणि यकृत स्वच्छ करते आणि निरोगी ठेवते.

3. वजन कमी करण्यात प्रभावी: तांब्याचे पाणी पचनशक्ती सुधारते, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. नियमित वापराने वजन झपाट्याने कमी होते.

4. मेंदूची शक्ती वाढते: तांबे मेंदूला तीक्ष्ण बनवते, अनेक तज्ज्ञांच्या मते तांबे न्यूरॉन्स सक्रिय करते. यामुळे आपला मेंदू वेगाने काम करू लागतो. तांब्याच्या भांड्यातील पाणी रोज प्यायल्याने स्मरणशक्ती सुधारते.

5. त्वचेची चमक वाढवते: सौंदर्य वाढवण्यासाठी आपण विविध प्रकारची रसायने वापरतो, परंतु या गोष्टी क्षणिक ठरतात, तसेच नंतर त्वचेचे नुकसान करतात. तांब्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे पेशींच्या आत जाऊन त्वचेला चमक देतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर आणि तरुण दिसते.