वजन कमी करताना येणारे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी '५' एक्स्पर्ट टिप्स !
Darshana PawarDarshana Pawar | Updated: Aug 16, 2017, 03:19 PM IST
वजन कमी करताना स्ट्रेच मार्क्स येणे काहीसे स्वाभाविक आहे. परंतु, हा त्रास टाळण्यासाठी डर्मोटॉलॉजिस्ट डॉ. सेजल शहा यांनी काही टिप्स दिल्या.
हळूहळू वजन कमी करा: पटकन वजन कमी केल्यास त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते. कारण त्वचेच्या वरच्या थरातील म्हणजेच डर्मिस मधील कोलेजन फायबर्सचे प्रमाण कमी होते. म्हणून वजन हळूहळू कमी करा.
दररोज स्ट्रेचिंग करा: दररोज हलकं स्ट्रेचिंग करा. त्यामुळे रक्तप्रवाह आणि त्वचेची इलॅस्टिसिटी सुधारते. त्यामुळे स्ट्रेच मार्क्सला आळा बसतो.
व्हिटॅमिन ए, सी आणि ई युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा: त्वचेचे टिशू सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए चा फायदा होतो. व्हिटॅमिन सी मुळे कोलेजनची निर्मिती वाढते.
भरपूर पाणी प्या: भरपूर पाणी प्या आणि स्वतःला नेहमी हायड्रेट ठेवा. डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी होते, त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते आणि स्ट्रेच मार्क्स येण्याची शक्यता वाढते. म्हणून दररोज ८ ग्लास तरी पाणी प्या.
क्रीम किंवा लोशन वापरा: कोलेजनचे प्रमाण वाढेल आणि स्ट्रेच मार्क्सला आळा बसेल असे क्रीम किंवा लोशन वापरा. ही क्रीम किंवा लोशन डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरणे योग्य ठरेल.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.