8 hours sleep : 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणंही ठरतंय तुमच्यासाठी धोकादायक!

यामध्ये तुम्ही किती तास झोपता याची देखील दखल घेणं महत्त्वाचं आहे. कारण आवश्यक झोप घेणं आणि गरजेपेक्षा जास्त झोप घेणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. 

Updated: Dec 8, 2022, 10:10 PM IST
8 hours sleep : 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणंही ठरतंय तुमच्यासाठी धोकादायक! title=

8 hours sleep : दररोजच्या थकव्यानंतर प्रत्येक व्यक्तीला रात्रीला झोप (Sleep) फार गरजेची असते. मनाला शांती मिळवण्यासाठी तसंच शरीराला आराम देण्यासाठी झोप घेणं फार गरजेचं आहे. पण यामध्ये तुम्ही किती तास झोपता याची देखील दखल घेणं महत्त्वाचं आहे. कारण आवश्यक झोप घेणं आणि गरजेपेक्षा जास्त झोप घेणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही 7-8 तासांची (8 hours sleep) पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्ही आजारी (Health tips) पडू शकता.

पुरेशी झोप घेतली नाही तर याचा परिणाम चेहऱ्यावर देखील दिसून येतो. अशावेळी तुमचा चेहऱ्याल जास्त वयाचं लक्षण दिसतं. शिवाय वजन वाढणं, कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक (Heart attacks), ब्लड प्रेशर आणि डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवू शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन(AHA) ने कमी झोप हे हार्ट संबंधित समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं म्हटलंय

हार्ट संबंधित (heart disease reason)आजार होण्यासाठी झोपच नाही तर यासोबतच अनेक कारणांचा समावेश आहे. व्यायामाचा अभाव, धुम्रपान करणं, अयोग्य आहार, वाढतं वजन, कोलेस्ट्रॉल तसंच ब्लड प्रेशरचा (blood pressure)यांचा समावेश आहे. 

अमेरिकन हार्ट असोसिएशनने ‘लाइफ्स एसेंशियल 8’ अशी एक चेकलिस्ट पीयर रिव्यूड जर्नल ‘सर्कुलेशन’ मध्ये पब्लिश केलीये. यामध्ये नमूद केल्यानुसार, स्मोकिंग, हाय कॅलरी डायट  कमी झोपणं या गोष्टी हृदयाशी संबंधित त्रास वाढवू शकतात.

कमी झोपल्यास निर्माण होणाऱ्या समस्या (poor sleep)

एका संशोधनांमध्ये असं नमूद करण्यात आलंय की, रात्रीच्या वेळेला 6 तासांपेक्षा कमी झोप घेतली तर लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, टाइप-2 डायबिटीज तसंच मानसिक आरोग्याचा धोका अधिक असतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, झोपेचा व्यक्तीच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. 

8 तासांपेक्षा जास्त झोपही तुमच्यासाठी धोकादायक

जर तुम्ही कमी झोप घेतली तर तुम्हाला आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही कमी झोप घेत असाल तर, असा म्हणून नका की, आता जास्त झोप घेतली पाहिजे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘कमीत कमी 7 झोप न घेणाऱ्या लोकांमध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढला होता. त्यामुळे 7 तासांपेक्षा जास्त झोप घेतली पाहिजे. मात्र याचा अर्थ असा नाही की, 8 तासांपेक्षा जास्त झोपलं पाहिजे.