Blood Clot Signs & Symptoms: तुमच्या शरीरातंही दिसून येतायत 'हे' बदल; शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याची असू शकते शक्यता!

ब्लड क्लॉट हे अनेक पद्धतीचे असतात. अधिकतर ब्लड क्लॉट हे पायाच्या खालील बाजूस होताना दिसतात. याव्यतिरीक्त हात, हृदय, पेल्विस, फुफ्फुस, मेंदू आणि पोट या भागांमध्येही रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. 

Updated: Dec 8, 2022, 05:23 PM IST
Blood Clot Signs & Symptoms: तुमच्या शरीरातंही दिसून येतायत 'हे' बदल; शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याची असू शकते शक्यता! title=

Blood Clot Symptoms : तुमच्या शरीराच्या नसांमध्ये (Veins) ज्यावेळी रक्ताच्या गुठळ्या (Blood Clot) तयार होतात, तेव्हा ती परिस्थिती खूप गंभीर असू शकते. अशावेळी व्यक्तीला हार्ट अटॅक (Heart attack) येण्याचा धोका असतो. मुळात ब्लड क्लॉट हे अनेक पद्धतीचे असतात. अधिकतर ब्लड क्लॉट हे पायाच्या खालील बाजूस होताना दिसतात. याव्यतिरीक्त हात, हृदय, पेल्विस, फुफ्फुस, मेंदू आणि पोट या भागांमध्येही रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. 

कोरोनाचा एक दुष्परिणाम म्हणजे, तुमच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणं. कोरोनानंतर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या व्यक्ती या व्हायरसशी संक्रमित झाले होते, त्यांच्यामध्ये जवळपास एका वर्षांनंतर रक्ताच्या गुठळ्या झालेल्या दिसून आलं. परिणामी यामुळे इतर आजारांचा धोकाही वाढत असल्याचं दिसून आलं.

तुमच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यानंतर अनेक लक्षणं दिसून येतात. अशा परिस्थितीत गरजेचं आहे की, आपण शरीरात दिसणारी ही लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. अशावेळी तातडीने तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करा. पाहूयात रक्ताच्या गुठळ्या (Blood Clot Symptoms) झाल्या की, कोणती लक्षणं दिसून येतात.

त्वचेचा रंग बदलणं

जर एखाद्या रक्ताच्या गुठळीमुळे तुमच्या हाता-पायांची नस बंद होत असेल तर तुमच्या त्वचेचा रंग बदलतो. यावेळी त्वचेचा रंग निळा किंवा लाल दिसू शकतो. नसा डॅमेज होऊन तुमची त्वचा फिकी पडू शकते.

सूज येणं

रक्ताची गुठळी जर तुमचा रक्तप्रवाहात अडथळा आणतो. यामुळे रक्त जमा होऊन पेशींना सूज येण्याची शक्यता असते. तुमच्या हात किंवा पोटात रक्ताची गुठळी तयार होऊ शकते. अशा परिस्थितीत, 3 पैकी 1 व्यक्तीला सूज येण्याची तक्रार उद्भवू शकते

छातीत वेदना होणं

जर तुमच्या छातीत वेदना होत असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरात तयार झालेली रक्ताची गुठळी फुटली आहे. अशा परिस्थितीत व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही असतो. शिवाय यावेळी हातामध्ये वेदना होण्याची तक्रार जाणवते.

श्वास घेण्यास त्रास

जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर फुफ्फुसात किंवा हृदयात रक्ताची गुठळी झाल्याचं लक्षण असू शकतं. यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात. शिवाय तुमची शुद्धही हरपू शकते. हे एक गंभीर लक्षण मानलं जातं.

सतत खोकला येणं

सतत खोकला येणं हे देखील शरीरात रक्ताची गुठळी असल्याचं लक्षण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मानण्याप्रमाणे, जर तुमच्या छातीत दुखापत होत असेल शिवाय खोकल्यातून रक्त येत असेल तर डॉक्टरांशी वेळीच बोलून घ्या.