Eating Tips: आपल्याला दोन वेळेच्या जेवणाची नितांत आवश्यकता असते. जेवताना आपल्यालाही अनेक पथ्य ही पाळावी लागतात नाहीतर आपल्याला जेवण जेवताना (Eating Habits) त्रासही होऊ शकतो. काहींना जेवायला बसल्यानंतर अनेक वाईट सवयीही (Bad Manners) असतात. त्यातील अशा काही गोष्टी म्हणजे अनेकांना जेवताना खूप बोलायची सवय असते तर अनेकांना जेवताना मध्ये मध्ये सारखं पाणी पिण्याचीही सवय असते. परंतु तुम्हाला माहितीये का की जेवताना अशा चुका किंवा अशा काही वाईट सवयी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, जेवणं जेवल्यानंतर 30 मिनिटांनी पाणी प्यावे. (eating tips what is the right time to drink water after having your meal know what science says)
आर्युवेदातही (Ayuerved) असे सांगितले आहे की, जेवणाच्या आधी पाणी पिणं हे अमृत आहे. जेवणासोबत पाणी पिणं म्हणजे आनंद आहे परंतु जेवण झाल्यानंतर पाणी पिणं हे विष आहे सोबतच जेवल्यानंतर काही तासांनी किंवा काही वेळानं पाणी पिणं हे शरीरासाठी बळ आहे, असं म्हटलं आहे.
शास्त्रानुसार, जेवण झाल्यानंतर पाणी प्यावे की पिऊ नये यावर स्पष्टीकरण आहे. त्यात असं सांगितलं आहे की, जर शक्य असल्यास जेवण जेवायच्या अर्धा तास आधी पाणी (Drinking Water Tips) प्यावे. त्यानं तुम्हाला भुक कमी लागेल आणि तुम्ही कमी खाण्याकडे वळता. परंतु जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका कारण त्यानं गॅसेस होण्याची शक्यता असते.
1. जेवल्यानंतर अशा गोष्टी लक्षात ठेवा ज्यानं तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. एक म्हणजे जर का तुम्हाला फीट राहायचे असेल तर तांब्यातील पाण्यातील प्यावे आणि जास्त करून गरम पाणी प्यावे.
2. जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. असं केल्यानं तुमचे जेवण पचन (Digestion) नाही.
3. कधीही उभं राहून पाणी पिऊ नका तर बसून पाणी प्या. त्याचसोबत पाणी पिताना घाई करू नका.
4. प्लॅस्टिक बॉटल्समधील पाणी अजिबातच पिऊ नका. त्यानं कर्करोगाचा (Cancer) धोका असतो.
आपल्या आरोग्य हे आपल्याच हाती आहे त्यामुळे तुम्हाला जेवताना अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचेही आहे. तुम्हाला जेवताना जास्त बडबड करायची सवय असेल तर तुम्ही त्यावेळी कमी बोलण्याची तयारी ठेवा. त्यानं तुम्हाला फार फायदा होईल. त्यासोबत खाताना जास्त घाई करू नका. हळू खा. जास्त फास्ट खायची (Fast eating) सुरूवात केली तर तुम्हाला त्याचा त्रासही होऊ शकतो. तेव्हा सावकाश खा आणि आपल्या शरीराला पुरेसे असेल तेवढेच अन्नांचे सेवन करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)