वयात येणाऱ्या मुलांमध्ये Eating Disorder चा त्रास सर्वात जास्त, डॉक्टरांकडूनच जाणून घ्या कारणे आणि उपाय!

Eating Disorder Awarness Week : आजच्या तरुणाईमध्ये Eating Disorder चे प्रमाण सर्वाधिक प्रमाणात जाणवते. याची कारणे काय आणि वयात येणाऱ्या मुलांवर याचा काय परिणाम होतो ते डॉ आरती सिंग, पोषण आणि आहारतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर यांच्याकडून जाणून घ्या

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 28, 2024, 12:48 PM IST
वयात येणाऱ्या मुलांमध्ये Eating Disorder चा त्रास सर्वात जास्त, डॉक्टरांकडूनच जाणून घ्या कारणे आणि उपाय! title=

Eating Disorder  ही समस्या गंभीर असून हा एक मानसिक आजार आहे. यामध्ये व्यक्ती गरजेपेक्षा जास्त खातो किंवा कमी खातो त्यामुळे त्याच्या आरोग्याचा धोका वाढतो. 15 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असते . खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किशोरवयीन मुलांमध्ये इटिंग डिसऑर्डरची समस्या निर्माण होते. इंटिग डिसऑर्डरच्या जनजागृतीसाठी 26 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत हा दिवस साजरा केला जातो. यासाठी आपण डॉ. आरती सिंग ज्या मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर येथे पोषण आणि आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून याबाबत माहिती जाणार आहोत. 

इटिंग डिसऑर्डरचे प्रकार 

  • एनोरेक्सिया नर्वोसा -  या समस्येने ग्रासलेले लोक भूक लागली तरी खाणे टाळतात. जास्त व्यायाम केल्याने त्यांचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. बहुतेक किशोरवयीन मुली याला बळी पडतात. 
  • बुलिमिया नर्वोसा - ज्यात वजन वाढू नये म्हणून लोकं त्यांचे आवडते पदार्थ  भरपूर खातात, त्यानंतर ते मुद्दाम उलट्या करतात जेणेकरून त्यांना जेवणाची चव मिळेल पण शरीरातील कॅलरीज वाढणार नाहीत. 
  • बिंज ईटिंग डिसऑर्डर - या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना दर अर्ध्या तासाच्या अंतराने बिस्किटे, नमकीन, वेफर्स यांसारख्या गोष्टी खाण्याची सवय असते. आपल्या अनियमित किंवा अल्प प्रमाणात खाण्यामुळे इटिंग डिसऑर्डरला बळी पडू शकतो.

कारणीभूत घटक

  • पौगांडावस्थेत होणारे बदल- पौगंडावस्थेमध्ये शारीरिक आणि हार्मोनल बदल दिसून येतात. या वयात खाण्याच्या सवयींसंबंधीत विकार बळावू शकतात.
  • सामाजातून येणारा दबाव - किशोरवयीन मुले समवयस्क आणि मीडियाद्वारे दाखविण्यात येणाऱ्या जाहिरातींना बळी पडू शकतात ज्यामुळे त्यांचे राहणीमान, वजन आणि शरीराच्या प्रतिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते.
  • अभ्यासाचा तणाव, चिंता यावर नियंत्रण ठेवण्याकरिता चुकीच्या आहाराच्या सवयींना बळी पडू शकतात.

काय आहेत दुष्परिणाम

  • ज्या मुलांचे पोषण कमी प्रमाणात होते त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे त्यांना आजार होण्याची शक्यता अधिक असते. 
  • हाडे ठिसूळ होणे, ऑस्टिओपोरोसिस सारख्या त्रासांना मुलं कमी वयात बळी पडतात. 
  •  या आरोग्य समस्यांच्या लक्षणांसाठी डॉक्टर नियमितपणे मुलांची तपासणी करतात.
  • हृदय आणि रक्तवाहिन्यांसबंधी रोग लहानपणी चरबीयुक्त पदार्थ, साखर आणि मीठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने प्रौढावस्थेत उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब आणि रक्तवाहिन्या कडक होण्याचा धोका वाढू शकतो.
  • टाइप 2 मधुमेह. मुलांमध्ये, हा आजार जास्त वजन, शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय असणे आणि टाईप 2 मधुमेहाचा कौटुंबिक इतिहासाशी संबंधित आहे.
  • काही श्वासोच्छवासाच्या समस्या, जसे की जास्त वजन असलेल्या मुलांमध्ये दम्याचा आजार बळावणे
  • यकृताच्या समस्याही मुलांमध्ये अगदी कमी वयात जाणवतात.
  • पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. हा हार्मोन असंतुलनामुळे होणारा विकार आहे ज्यामुळे मुलींना मासिक पाळी आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.  

किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक कारणांमुळे जसे की, सुंदर दिसणे आणि आपल्या बॉडी इमेजबद्दल खुश नसणे यांसारख्या कारणांचा समावेश होतो. चिंता आणि नैराश्य ही सुद्धा दोन महत्त्वाची कारणे आहेत. बारीक दिसणे वा कोणाला आपल्याकडे आकर्षिक करण्याच्या विचाराने, बॉडी शेमिंग तसेच शाळेत दुसऱ्या मुलांनी टिंगल उडवल्यावर सुधा किशोरवयीन मुलांमध्ये इटिंग डिसऑर्डर दिसून येऊ शकतो.