लहान मुलांसह मोठ्या संख्येने लोकांना ॲसिडीटी, अपचन, मळमळ आणि उलट्या, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अतिसार, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज (GERD), आणि पावसाळ्यात सूज येणे यांचा त्रास होतो. यावेळी पावसाळ्यात जठरासंबंधी समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि आतडे निरोगी ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, हे जाणून घेऊया
नवी मुंबईतील पोट विकार तज्ज्ञ, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्यूटिक एंडोस्कोपिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्यातील वाढत्या आर्द्रतेमुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे, एखाद्याची पचनसंस्था मंदावते आणि पावसाळ्यात अशा प्रकारे पचनाच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. दूषित अन्न आणि पाण्यामुळे गॅस्ट्रोएन्टेरिटिस होऊ शकतो जो पोट आणि आतड्यांसंबंधीत दाह निर्माण करतो. याशिवाय पोटदुखी आणि वेदना, पोटफुगणे, मळमळ आणि उलट्या, बद्धकोष्ठता,ॲसिडिटी, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (GERD),अतिसार यांचा त्रास होऊ शकतो.जंतू आणि जिवाणू असलेले उघड्यावरील पदार्थ किंवा शिळे अन्न खाल्ल्याने मुलांना विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यात आतडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी या महत्त्वपूर्ण उपायांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.