Weight loss : वजन कमी करताना तुम्ही या चुका तर करत नाहीत ना?

योग्य आहारासह, व्यायामाच्या माध्यमातून वजन कमी करता येतं. 

Updated: Jun 12, 2021, 05:56 PM IST
Weight loss : वजन कमी करताना तुम्ही या चुका तर करत नाहीत ना? title=

मुंबई : वजन कमी करणं ही एक अवघड प्रक्रिया आहे, परंतु योग्य आहारासह, व्यायामाच्या माध्यमातून वजन कमी करता येतं. मात्र अनेक लोकं वजन कमी करताना सामान्य चुका करतात. वजन कमी करायचं म्हटलं की, आपण अशा चुका करतो ज्यामुळे वजन कमी होत नाही. बरेच लोक वाढलेल्या वजनाने त्रस्त आहेत आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित तुम्हीही अशा चुका करत असाल. तर आज जाणून घेऊया वजन कमी करताना कोणत्या चुका आपल्याकडून घडतात.

वजनाच्या आकड्यावर लक्ष असणं

वजन कमी करणं म्हणजे आकडा कमी करणं नव्हे. याचा अर्थ असा की आपण निरोगी शरीरासह रोगांपासून दूर रहावं. जर आपण फक्त आकड्यावर लक्ष केंद्रित केलं तर आपण पुरेसा पौष्टिक आहार घेत नाही. यामुळे, आपल्याला बर्‍याच समस्यांना सामोरे जावं लागतं. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आपल्या आरोग्याकडे लक्ष न दिल्यास शरीराची हानी होऊ शकते.

आहारात फॅट्स प्रमाण कमी करणं

प्रत्येक व्यक्ती ज्याला वजन कमी करायचा आहे, तो आपल्या आहारातील फॅट्स प्रमाण कमी ठेवतो. मात्र हा वजन कमी करण्यासाठी उपाय नाही. कमी फॅटयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला जास्त खाण्याची इच्छा निर्माण होते आणि भूकदेखील जास्त लागते. यामुळे तुम्ही जास्त जेवता परिणामी वजन कमी होण्यऐवजी ते वाढतं.

पुरेसं प्रोटीनचं प्रमाण न घेणं

हेल्दी प्रोटीनचा आहार घेतल्यास आपलं पोट बराच वेळे भरलेलं राहते. याशिवाय ते आपल्याला पुरेशी ऊर्जा देखील देतं. वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये प्रोटीन घेतल्यास आपण कमी कॅलरी घेतो. ज्यामुळे आपला चयापचय दर वाढतो आणि स्नायू मजबूत होतात.

बर्न करण्यापेक्षा कॅलरीजचं सेवन अधिक होणं

ज्या लोकांचं वजन जास्त आहे त्यांच्यासाठी अनहेल्दी खाणं सोडणे अधिक कठीण आहे. म्हणूनच सुरुवातीला तुम्ही कॅलरी बर्न करण्यापेक्षा जास्त प्रमाणात कॅलरी घेता. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी खा. पौष्टिक आहार आणि व्यायामाद्वारे वजन हळूहळू कमी करू शकता.