तुमच्या आहारात असलेले 'हे' पदार्थ वाढवतायत तुमची गुडघेदुखी!

संधिवात किंवा ऑस्टियोआर्थराइटिसचा त्रास असेल तर तुम्ही काही पदार्थ खाणं टाळलं पाहिजे

Updated: Apr 26, 2022, 03:44 PM IST
तुमच्या आहारात असलेले 'हे' पदार्थ वाढवतायत तुमची गुडघेदुखी! title=

मुंबई : अयोग्य आहार आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, तुमच्या चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे गुडघे दुखण्याचीही समस्या बळावू शकते. जर तुम्ही आधीच संधिवात किंवा ऑस्टियोआर्थराइटिसचा त्रास असेल तर तुम्ही काही पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. आज जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे अतिप्रमाणात खाणं टाळलं पाहिजे.

गुडघेदुखी का होते?

गुडघेदुखीचा तुमच्या दैनंदिन कामांवर परिणाम होतो. या वेदेनेची विविध कारणं असू शकतात. या दुखण्यामागे स्नायूंचा ताण, युरिक ऍसिडची वाढलेली पातळी, संधिवात किंवा ऑस्टियोआर्थराइटीसची समस्या ही कारणं असू शकतात.

साखर

अतिप्रमाणात साखरेचं सेवन केल्याने केवळ डायबेटीज नाही तर गुडघे आणि सांधेदुखीचाही त्रास होऊ शकतो. संशोधकांच्या मते, साखर प्रो-इंफ्लेमेटरी तत्त्व रिलीज करते. ज्यामुळे तुम्हाला शरीरात वेदना होऊ शकतात. शरीरातील अतिरिक्त साखर प्रथिनांमध्ये मिसळून ग्लायकेशन नावाचं कंपाऊंड तयार करते. ज्यामुळे तुमचे गुडघे दुखू शकतात.

ग्लूटन

ग्लूटन हा प्रोटीनचा एक प्रकार आहे. यामुळे तुमच्या सांधेदुखीचा त्रास वाढू शकते. एका संशोधनानुसार, ग्लूटनयुक्त पदार्थ शरीरात प्रो-इंफ्लेमेटरी कंपाऊंड एक्टिव्ह करतात. ज्यामुळे गुडघेदुखी आणखी वाढू शकते. 

मीठ

जर तुम्ही संधिवात किंवा ऑस्टियोआर्थराइटिसचे रुग्ण मिठाचं सेवन टाळावं. सामान्य लोकांपेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये वेदना वाढू शकतात. 

हाय फॅट डेअरी प्रोडक्ट्स

काही दुग्धजन्य पदार्थांचं अति प्रमाणात सेवन केल्याने गुडघे दुखू शकतात. आईस्क्रीम, चीज यांच्या सेवनाने गुडघे आणि सांधेदुखी अजून बळावू शकते. कारण या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे गुडघेदुखी वाढते.