प्रत्येकाला 8 ग्लास पाण्याची गरज - सत्य की निव्वळ गैरसमज ?

आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने किमान 8 ग्लास प्यायालाच हवे असा सल्ला तुम्हीदेखील अनेकदा ऐकला असेल. 

Updated: Jun 12, 2018, 11:42 AM IST
प्रत्येकाला 8 ग्लास पाण्याची गरज - सत्य की निव्वळ गैरसमज ?  title=

मुंबई : आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने किमान 8 ग्लास प्यायालाच हवे असा सल्ला तुम्हीदेखील अनेकदा ऐकला असेल. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते हा सल्ला सर्रास लक्षात घेऊन अनेकजण तहान लागलेली नसतानाही घटाघटा पाणी पितात. अति तेथे माती हा नियम पाण्यासाठीही लागू होतो.. त्यामुळे तुम्हीही नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डोळे झाकून मानत असाल तर हा सल्ला नक्की वाचा ... 

खरंच 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे का ? 

पाणी शरीराला घातक ठरण्याची शक्यता इतर पदार्थांच्या तुलनेत कमी असतो. मात्र पाण्याचे अतिसेवनही आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. प्रत्येकाने 8 पाणी प्यायल्याच हवे या सल्ल्याला कोणताही थेट वैज्ञानिक आधार नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, गरजेनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार पाणी किती प्रमाणात प्यावे  हे अवलंबून असते. 

पाण्याची नेमकी गरज कशी ओळखावी ? 

 The National Academies of Sciences, Engineering, and Medicine च्या दाव्यानुसार, स्त्रियांना 11.5 कप (2.7 लीटर) तर  पुरूषांना 15.5 कप 3.7 लीटर पाण्याची गरज असते. ही गरज पाण्यासोबतच इतर द्रवयुक्त पदार्थांमधूनही पूर्ण केली जाऊ शकते. शरीराचे हायड्रेशन म्हणजेच पाण्याची गरज हा एक ठराविक आकडा नसून त्याच्या भोवतालच्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते.