रात्रीच्या जेवणात 'या' चूकांमुळे वाढतोय तुमचा लठ्ठपणा

आपल्या आहारावर आरोग्य अवलंबून असते. 

Updated: Nov 15, 2018, 01:13 AM IST
रात्रीच्या जेवणात 'या' चूकांमुळे वाढतोय तुमचा लठ्ठपणा  title=

मुंबई : आपल्या आहारावर आरोग्य अवलंबून असते. दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, नाश्त्यापेक्षा कमी परंतू आवश्यक इतके दुपारचे जेवण आणि त्याहून कमी रात्रीचे जेवण असा आहार असावा हे डाएटचं गणित सांगितले जाते. मात्र आजकल धावपळीच्या झालेल्या आयुष्यात हे चक्र अगदी उलटं झालं आहे. अनेकांना सकाळी नाश्ता करायला वेळच नसतो, दुपारचं जेवण अत्यल्प आणि त्यानंतर रात्री आल्यानंतर पूर्ण जेवलं जातं. मात्र आपल्या लाईफस्टाईलचा आरोग्यावर गंभीर होतो हे आपण विसरतो.  

जेवण्याच्या चूकीच्या सवयी आणि वेळा यामुळे वजन वाढतं. मग तुम्हीही वेट लॉसच्या मिशनवर असाल तर रात्रीच्या जेवणाच्या या चूका टाळा. 

रात्रीच्या जेवणात 'या' चूका नकोच !   

1) रात्री झोपण्यापूर्वी भरपूर जेवणं 

रात्रीच्या जेवणात आणि झोपण्यामध्ये किमान 2 तासांचे अंतर असणं आवश्यक आहे. अन्न नीट पचलेले नसले तर यामधून अपचन, पित्त, गॅस, ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्री 10  वाजता झोपणार असाल तर किमान संध्याकाळी  7.30 - 8 
वाजेपर्यंत जेवण आवश्यक आहे. 

2) अति खाणं  

रात्रीच्या जेवणात फ्राईड राईस, बिरयाणी, छोले पराठे असे पचायला जड पदार्थांवर ताव मारणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. आहरात सार्‍या पोषकघटकांचा तोल सांभाळणं गरजेचे आहे. त्यामुळे रात्री फार जड पदार्थ खाणं टाळा. रिफाईन्ड फूड्सचा पर्याय टाळा. 

3) वेळेत रात्रीचं जेवण तयार न होणं 

तुमचा रात्रीचा मेन्यू आधीच प्लॅन करणं आवश्यक आहे. अनेकजण रात्री जेवन बनवण्याचा कंटाळा करतात मग हॉटेलमधून ऑर्डर केलेले पदार्थ खाल्ल्यने वजन वाढते. आठवडाभर पुरेल इतक्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे आठवडाभर काय काय बनवू शकता ? याचं प्लॅनिंग करू शकता. 

4) अल्कोहल आणि कॅफिनयुक्त पदार्थ टाळा 

अल्कोहल, कॅफिनयुक्त पदार्थांमुळे झोपेचं चक्र बिघडू शकते. साखर आणि कॅफिनयुक्त पदार्थांमुळे झोप कमी होते. परिणामी मधुमेह, लठ्ठपणा वाढतो.