Diet Soda: डाएट सोडा पिताय? तर आजच थांबवा, नाहीतर आंधळे व्हाल!

डाएट सोडा तुमच्या डोळ्यांसाठी एक मोठा धोका असू शकतो. एका संशोधन अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

Updated: Aug 17, 2022, 02:28 PM IST
Diet Soda: डाएट सोडा पिताय? तर आजच थांबवा, नाहीतर आंधळे व्हाल! title=

मुंबई : तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? मात्र तुम्हाला माहितीये का डाएट सोडा तुमच्या डोळ्यांसाठी एक मोठा धोका असू शकतो. एका संशोधन अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. यानुसार डाएट सोडा जास्त प्रमाणात घेतल्यास डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते, जी डोळ्यांसाठी हानिकारक आहे. 

तज्ज्ञांनी केलेल्या या अभ्यासात असं दिसून आलंय की, दर आठवड्याला सुमारे 1.5 लिटर (चार कॅन) डाएट सोडा प्यायल्याने डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका दुपटीने वाढू शकतो.

या अभ्यासामध्ये नॉन-अल्कोहोलयुक्त कोल्ड ड्रिंक आणि डोळ्यांचं आरोग्य यांच्यातील संबंध तपासण्यात आला. हा अभ्यास 609 लोकांवर आधारित आहे, ज्यापैकी 73 जणांना टाइप 1 मधुमेह होता, 510 जणांना टाइप 2 मधुमेह होता आणि उरलेल्या 26 जणांबद्दल डेटा अस्पष्ट होता. 

या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींचं वय सरासरी 65 वर्षे होतं. यापैकी 46.8% ने नियमित कोल्ड ड्रिंक प्यायले होते आणि बाकीच्यांनी डाएट सोडा घेतला होता.

या अभ्यासात असं आढळून आलं की, जे नियमित कोल्ड ड्रिंक पितात त्यांना हा आजार होण्याची शक्यता डाएट सोडा पिणाऱ्यांपेक्षा कमी असते.

डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय?

डायबेटिक रेटिनोपॅथी ही मधुमेहाबाबतची कॉम्पिलेकशन आहे. ज्यामध्ये उच्च साखरेची पातळी डोळ्याच्या रेटिनाला नुकसान पोहोचवते. त्यावर उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकतं. त्यामुळे मधुमेही रुग्णांना नियमित डोळ्यांची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून कोणतीही गंभीर गुंतागुंत टाळता येईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)