Fertility Boosting: मुळा खाल्ल्याने खरंच फर्टिलिटी वाढते का? जाणून घ्या

 भारतीय आहारामध्ये मुळ्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. बारा महिने उपलब्ध असलेला मुळा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.

Updated: Aug 17, 2022, 01:41 PM IST
Fertility Boosting: मुळा खाल्ल्याने खरंच फर्टिलिटी वाढते का? जाणून घ्या   title=

Fertility Boosting: सध्याच्या धावपळीच्या युगात स्वत:च्या आरोग्याकडे बघायला देखील वेळ मिळत नाही. यामुळे अनेकांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा सामना करावा लागत आहे. काही अंशी धूम्रपान आणि व्यसनदेखील याला कारणीभूत आहे. महिला आणि पुरुषांमध्ये अनेक समस्या वाढत आहेत. यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. आपल्या रोजच्या जेवणातील काही पदार्थ ताणतणावापासून दिलासा देतात. काही पदार्थांकडे फर्टिलिटी बूस्टिंग म्हणून पाहिलं जातं. यात मुळ्याचं नाव आघाडीवर येतं. भारतीय आहारामध्ये मुळ्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. बारा महिने उपलब्ध असलेला मुळा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.  मुळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर होते. दुसरीकडे प्रजनन क्षमता वाढण्यासाठी मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मुळा खरंच प्रजनन क्षमता वाढवण्यात मदत करतो का? असा प्रश्न निर्माण होतो. 

मुळा हा एक प्रकारची कंद भाजी आहे. मुळा रंगाने पांढरा आणि चवीला तिखट आणि उग्र वास असतो. हा मुळा औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. मुळा पचनासाठी उपयुक्त असून गॅस कमी करण्यास मदत करतो. मूळव्याध कमी करण्यासही मुळा फायदेशीर ठरतो. मुळ्यात बी-6 जीवनसत्त्व, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आहे. 

मुळा खाल्ल्याने महिला आणि पुरुषांमध्ये नपुंसकत्व किंवा वंध्यत्वाची समस्या कमी होते, असा दावा केला जातो. मात्र अजूनही यावर ठोस असं उत्तर नाही. नपुंसकत्वावर घरगुती उपाय म्हणून मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो. रोज मुळा खाल्ल्याने प्रजनन क्षमता वाढते असेही म्हणतात. मुळ्याव्यतिरिक्त, मुळ्याच्या बिया देखील प्रजननक्षम अन्न असल्याचे म्हटले जाते. महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी येण्यासारख्या समस्यांमुळे त्यांना गर्भधारणेतही समस्या येतात. त्यामुळे मुळा फायदेशीर असल्याचे सांगण्यात येते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)