Dark lips treatment | ओठ काळे पडताय? वापरा हे घरगुती सोपे उपाय

dark lips treatment जर तुमच्या ओठांचा रंग गडद होत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा.  

Updated: Jul 1, 2022, 04:05 PM IST
Dark lips treatment | ओठ काळे पडताय? वापरा हे घरगुती सोपे उपाय title=

मुंबई :dark lips treatment   अनेक लोकांचे ओठ हळूहळू काळे होतात. बरेच लोक असे मानतात की धूम्रपान केल्याने असे होते आणि ओठ काळे होतात. परंतू अनेक लोकं धूम्रपान करत नाहीत, तरीही त्यांचे ओठ हळूहळू काळे होतात. तज्ज्ञांच्या मते, हे जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होते, म्हणून आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

 डाळिंबाचा रस
डाळिंबाचा रंग गुलाबी असतो हे तुम्हाला माहीत आहे. डाळिंबाचा रस ओठांवर लावल्याने तुमच्या ओठांचा रंग गुलाबी होऊ शकतो. तुम्ही डाळिंबाचे गाजर आणि बीटचा रस मिक्स करून ओठांवर लावू शकता. काही दिवसात तुम्हाला चांगले परिणाम परिणाम पाहायला मिळतील.

बदाम तेल
बदामाचे तेल आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्याची महागडी किंमत तुम्ही समजू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही लिंबाच्या रसामध्ये बदामाचे तेल मिसळून ओठांवर लावू शकता, काही दिवसात तुम्हाला त्याचे फायदे मिळू लागतील.

ऑलिव तेल
ऑलिव्ह ऑईल अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. ज्याबद्दल तुम्ही अनेक डॉक्टर आणि तज्ज्ञांकडून ऐकले असेल. विशेषतः ऑलिव्ह ऑईल आपल्या त्वचेची निगा राखण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑईल आणि 1 चमचा साखर मिक्स करून ओठांवर आरामात लावल्यास पिगमेंटेशनच्या समस्येपासून सुटका मिळेल.

गुलाब पाणी
गुलाबजल त्वचेची निगा राखण्यासाठी फायदेशीर आहे आणि गुलाबपाणी लावल्याने ओठ काळे होण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. ओठ गुलाबी करण्यासाठी गुलाबजल देखील फायदेशीर आहे. त्यामुळे रोज ओठांवर गुलाबपाणी लावा. याचा परिणाम तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल.

कोरफड जेल
त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कोरफड हा रामबाण उपाय मानला जातो. जर तुम्ही दररोज रात्री तुमच्या ओठांवर एलोवेरा जेल लावले तर तुमची पिगमेंटेशनची समस्या दूर होईल.