Zoonotic Langya virus ची दहशत; ही नव्या संकटाची चाहूल तर नाही?

काय आहेत Zoonotic Langya virus ची लक्षणं? 

Updated: Aug 9, 2022, 10:35 AM IST
Zoonotic Langya virus ची दहशत; ही नव्या संकटाची चाहूल तर नाही?  title=
Zoonotic Langya virus found in China

Zoonotic Langya virus : कोरोनाचं सावट अद्यापही दूर गेलेलं नसतानाच गेल्या काही दिवसांपासून काही नव्या संसर्गांनी डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एक भीती वाढवणारी बातमी समोर आल्यामुळं जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

चीनमध्ये Zoonotic Langya virus मुळं 35 जणांना संसर्ग झाल्याच्या बातमीनं संपूर्ण जगाला हादरा दिला आहे. The Langya henipavirus चीनच्या Shandong शॅनडाँग आणि हेमान प्रांतात सापडला असून, त्याचा संसर्ग प्राण्यांपासून माणसांपर्यंत झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. (danger Zoonotic Langya virus found in China with 35 human infections symptoms)

दरम्यान, सदर भागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अद्यापही या विषाणूच्या माणसांपासू माणसांमध्ये होणाऱ्या संसर्गाची कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. 

चाचण्यांतून काय निष्कर्ष? 
सेरोलॉजिकल सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार 2 टक्के बकऱ्या आणि 5 टक्के श्वान या चाचणीमध्ये Positive आले. चीनमधील 35 रुग्णांपैकी कोणीही एकमेकांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळालेली नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून कोणालाही संसर्ग झाल्याची चिन्हं स्पष्ट होऊ शकलेली नाहीत. 

Zoonotic Langya virus ची लक्षणं काय? 
या विषाणूचा संसर्ग असणाऱ्यांमध्ये ताप, मळमळ, सर्दी- पडसं, भूक कमी होणं, सांधेदुखी, डोकेदुखी आणि उलट्या अशा लक्षणांची नोंद करण्यात आली आहे. शरीरात पांढऱ्या पेशींची कमतरता होत असल्याची बाबही अशा रुग्णांतून समोर आली आहे. यकृत निकामी होणं, मुत्राशय निकामी होणं, अशी परिस्थितीही यामध्ये उदभवत असल्याचं निरिक्षणास आलं आहे.