डोकं आणि डोळ्यात होतायत तीव्र वेदना, 'हे' उपाय करा

तुमच्या जीवनशैलीतील 'या' गोष्टीवर लक्ष दिल्यास समस्या होईल दुर, जाणून घ्या 

Updated: Aug 8, 2022, 10:54 PM IST
डोकं आणि डोळ्यात होतायत तीव्र वेदना, 'हे' उपाय करा title=

मुंबई : आजकालची  तरूणपिढी ताणतणावात जगतेय. या तरूण- तरूणींना डोकं आणि डोळेदुखीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. खरं तर डोके आणि डोळे दुखण्याचे कारण दिवसभर तणाव, मायग्रेन, सायनस असू शकते. मात्र, तुम्ही औषध आणि काही घरगुती उपायांचा अवलंब करून या दुखण्यावर मात करू शकता.जाणून घेऊया कसं या आजारावर नियंत्रण मिळवता येणार. 
 
तेल मालिश : डोकेदुखी असो किंवा डोळे दुखी, या सर्व दुखण्यावर मसाज केल्याने सर्वाधिक आराम मिळतो. खरं तर, डोकेदुखीसाठी तेल मालिशची कृती वर्षानुवर्षे अवलंबली जात आहे. त्यामुळे खूप आराम मिळतो.

पुरेशी झोप घ्या : अनेक वेळा पुरेशी झोप न मिळाल्यानंतरही डोकेदुखी सुरू होते. जास्त मोबाईल बघूनही डोकं आणि डोळे दुखायला लागतात. यासाठी पुरेशी आणि गाढ झोप घेणे आवश्यक आहे. किमान 7-8 तास झोपणे आवश्यक आहे. यामुळे डोकेदुखी दूर होईल.

मेडिटेशन :  मन तणावमुक्त करण्यासाठी आणि डोकेदुखी दूर करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन केले पाहिजे. दररोज काही मिनिटे मेडिटेशन केल्याने तुमची डोकेदुखी आणि डोळ्यांचे दुखणे नाहीसे होईल.

खाण्यापिण्याकडे लक्ष द्या : जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या खाण्यापिण्याकडे आणि जीवनशैलीकडेही लक्ष द्या. आहारात अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा. जेवणात लसूण, लिंबू यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

तीव्र वास टाळा : काही लोकांना तीव्र वासामुळे डोकेदुखी होते. अशा परिस्थितीत परफ्यूम आणि साफसफाईची उत्पादनामुळे डोकेदुखी होऊ शकतात. अशा वासामुळे तुमचे डोके दुखू शकते. त्यामुळे या वासांपासून दुर राहा. 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)