मुंबई : आजकाल बीअर्डचा ट्रेंड आहे, त्यामुळे प्रत्येक तरूणाच्या चेहऱ्यावर दाढी दिसेलचं. मात्र चेहऱ्यावर भली मोठी दाढी ठेवण की रोज शेव्हिंग (Daily Shaving) करण योग्य असतं ? असा प्रश्न समोर येत आहे. याचं प्रश्नाचं उत्तर या बातमीत शोधूया.
दररोज रोज शेव्हिंग (Daily Shaving) केल्याने तुमची त्वचा केवळ सुंदरच नाही तर तजेलदारही बनते. तज्ञानुसार दररोज शेव्हिंग केल्याने केवळ चेहऱ्याचे केस स्वच्छ होत नाहीत तर त्वचेच्या वरच्या पृष्ठभागावर जमा झालेली मृत त्वचाही नाहीशी होते. चांगले शेव्हिंग केल्याने तुम्हाला ताजे आणि उत्साही वाटते.
खरं तर, शेव्हिंगशी संबंधित एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक सकाळी सर्वात आधी दाढी करतात ते अधिक प्रोडक्टिव असतात. या अभ्यासानुसार, जे लोक कामावर जाण्यापूर्वी सकाळी लवकर दाढी करतात त्यांची दिवसभराची कामे अधिक पद्धतशीरपणे करण्याची क्षमता असते.
जंतूंपासून संरक्षण
असे अनेक जंतू आपल्या दाढीच्या केसांमध्ये लपलेले असतात, जे त्वचा खराब करण्याचे काम करतात. त्यामुळे चेहऱ्यावर डाग वाढू लागतात. रोज दाढी केल्यानेही या जंतूंपासून आराम मिळतो. तसेच शेव्हिंग क्रीम, जेल, प्री-शेव्ह ऑइल किंवा बाम जे तुम्ही रोज शेव्हिंग करताना वापरता, ते सर्व तुमच्या त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात.
फायदे काय?
नियमित शेव्हिंग (Daily Shaving) त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकते. तसेच शेव्हिंग आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर सौम्य मसाज म्हणून काम करून त्वचेला आतून बरे करण्यास मदत करते. नियमितपणे दाढी केल्याने त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेतील मेलेनिन आणि केराटिनचे उत्पादन वाढते. यामुळे, नवीन तयार झालेली त्वचा जुन्या त्वचेपेक्षा खूपच तरुण दिसते आणि तिला लवकर बरे होण्याची संधी मिळते.
शेव्हिंगनंतर 'या' गोष्टी लावा
स्किन एक्सपर्ट (Skin expert) सांगतात की, शेव्हिंग करताना काही नैसर्गिक गोष्टी त्वचेवर लावल्याने खूप फायदा होतो. शेव्हिंगनंतर चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही थंड दूध, पपई, सफरचंद सायडर व्हिनेगर यासारख्या काही गोष्टी वापरू शकता. या गोष्टींमुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर पुरळ उठणे, जळजळ आणि खाज येण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)