मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. पण आता राज्यात रूग्णसंख्या काहीप्रमाणत कमी होताना दिसत आहे. बहुतेक लोक ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना या विषाणूचा परिणाम होतो. अशा परिस्थितीत, रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्याचा सल्ला डॉक्टर आणि तज्ज्ञ देत आहेत. तज्ज्ञ म्हणतात की ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, ते या विषाणूचा बळी पडतात. ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, ते या विषाणूवर मात करू शकतात.
रोग प्रतिकारशक्ती कमी असण्याची लक्षणं
सतत आजारी पडणं : हवामान बदलल्यामुळे आपल्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होतो आणि जर तुम्ही लवकरच आजारी पडलात तर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
थकवा येणं : सकाळी उठल्यावरही शरीरात अशक्तपणा आणि थकवा वाटत असेल. झोप पूर्ण होत नसेल. यामागे बरीच कारणे असू शकतात. जर तुम्हाला झोपेच्या वेळी थकवा येत असेल तर तुमची प्रतिकारशक्ती बळकट करा.
पोटाचे विकार : ज्या व्यक्तींचा पोटाचे विकार सतावतात जसे अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. यात पाचनशक्ती सुधारणारे चांगले बॅक्टेरिया असतात. तसेच उच्च प्रतीचे प्रोटीनही असते.
रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?
आपल्याला बर्याच रोगांशी लढण्यासाठी व्हिटॅमिन ई आवश्यक आहे. आधुनिक शोधांनुसार शिमला मिर्चीत बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि जिएक्सेन्थिन आणि व्हिटॅमिन ई सारखे महत्त्वपूर्ण रसायन असतात. शिमला मिर्ची खाल्लायनं शरीर बीटा कॅरोटीनचं रेटिनॉलमध्ये रुपांतर करतं.