Coronavirus: एक ग्लास दूध आपल्याला या आजारापासून ठेवते दूर, संशोधनातून हे स्पष्ट

 आज आपण दुधाचे फायदे जाणून घेणार आहोत. (The health benefits of milk) दुधाचे सर्व फायदे तुम्हाला माहितच असावेत.  

Updated: May 26, 2021, 07:06 AM IST
Coronavirus: एक ग्लास दूध आपल्याला या आजारापासून ठेवते दूर, संशोधनातून हे स्पष्ट title=

मुंबई : सध्या कोरोनाचा (Coronavirus) काळ आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देत आहे. आज आपण दुधाचे फायदे जाणून घेणार आहोत. (The health benefits of milk) दुधाचे सर्व फायदे तुम्हाला माहितच असावेत. दुधाला शरीरासाठी नेहमीच आवश्यक घटक मानले जाते. एवढेच नाही तर दूध हृदयरोगांचे आजार बरे करते, परंतु शरीरास आवश्यक पौष्टिकताही देखील प्रदान करते. परंतु नवीन संशोधनात असे समोर आले आहे की दररोज एका ग्लास दुधाचे सेवन केल्याने शरीरास गंभीर हृदयरोगांपासून संरक्षण मिळते. ( benefits of milk)

New study on milk

आंतरराष्ट्रीय संशोधनात असे समोर आले आहे की, दुधाचे सेवन केल्याने केवळ हृदयविकाराचा धोका कमी होत नाही तर कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते. या संशोधनात दोन दशलक्ष अमेरिकन आणि ब्रिटिश नागरिकांचा समावेश होता, ज्याचे निकाल आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

संशोधनात असे आढळले आहे की, जे दररोज एक ग्लास दुधाचे सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा धोका 14 टक्के कमी होतो. तथापि, आतापर्यंत दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक मानले जात होते.

cholesterol level

दररोज दूध पिणार्‍या लोकांचे बॉडी मास इंडेक्स सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. याकडेही संशोधनात लक्ष वेधले गेले आहे. कोलेस्टेरॉलची पातळी कमी केल्याने संशोधनास योग्य संबंध सापडला नाही. या संशोधनात अनेक विद्यापीठांचे तज्ज्ञ सहभागी झाले होते.

दुधाचे सेवन केल्याने शरीर मजबूत होते. दूध शरीरात आवश्यक जीवनसत्त्वे आणि प्रथिने देखील प्रदान करते. हा अभ्यास लठ्ठपणाच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ज्याची जगभर चर्चा होत आहे.