कोरोनाचा सर्वनाश करणारा आयुध आता लोकांच्या हाती

अमेरिकन कंपनी फायझरची COVID-19 अँटी-व्हायरल गोळीच्या वापराला मान्यता दिली आहे. ही गोळी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर प्रभावी असून संसर्गाला रोखण्यास मदत होईल असं तज्ज्ञांचं मत आहे.

Updated: Jan 28, 2022, 09:34 AM IST
कोरोनाचा सर्वनाश करणारा आयुध आता लोकांच्या हाती title=

लंडन : कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता लसीसोबत अँटीव्हायरल गोळी देखील मदत करणार आहे. European Union’s Health Regulatorने अमेरिकन कंपनी फायझरची COVID-19 अँटी-व्हायरल गोळीच्या वापराला मान्यता दिली आहे. ही गोळी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर प्रभावी असून संसर्गाला रोखण्यास मदत होईल असं तज्ज्ञांचं मत आहे.

युरोपियन मेडिसिन्स एजन्सीकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनात त्यांनी, कोरोनाची लागण झालेल्या प्रौढांच्या उपचारांसाठी Paxlovidला अधिकृत करण्याची शिफारस केली आहे. 

Paxlovid आत्तापर्यंत युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि इस्रायलसह काही मोजक्या देशांमध्‍ये 12 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना देण्यासाठी मंजूर आहे.

WION मध्ये दिलेल्या बातमीनुसार, युरोपियन युनियनने सदस्य देशांना औपचारिक मंजुरीपूर्वी ओमायक्रॉन व्हेरिएंट विरुद्ध आपत्कालीन उपाय म्हणून Pfizer ची गोळी वापरण्याची परवानगी दिली आहे. या औषधामध्ये दोन प्रकारच्या गोळ्यांचा समावेश आहे, पहिली कोविड-19 थेरपी जी घरी घेतली जाऊ शकते. याचा वापर गंभीर रूग्णांवर करण्यात येतो. 

मृत्यूचा धोका कमी होतो

Ritonavir नावाचे दुसरं औषध पाच दिवस दिवसातून दोनदा घेण्याची शिफारस केली जाते. Ritonavir हे सामान्य अँटीव्हायरल आहे. याचा वापर कोरोना व्हायरसच्या पेशींवर हल्ला करण्यासाठी केला जातो.

फायझरच्या एका अभ्यासात, गंभीर COVID-19 होण्याचा धोका असलेल्या 2,200 हून अधिक लोकांचा समावेश केला होता. यामधून असं लक्षात आलं की, Paxlovid ने रूग्णालयात दाखल होण्याचा तसंच किंवा मृत्यूचा धोका 89 टक्क्यांनी कमी केला होता.