तुम्ही खाताय भेसळयुक्त तूप? घरच्याघरी या सोप्या टिप्स वापरा आणि ओखळा शुद्धता

चार सोप्या पद्धती वापरून तुम्ही ओळखू शकता भेसळयुक्त तूप

Updated: Oct 8, 2022, 04:27 PM IST
तुम्ही खाताय भेसळयुक्त तूप? घरच्याघरी या सोप्या टिप्स वापरा आणि ओखळा शुद्धता title=

डाळ, पराठे असे अनेक पदार्थ बनवण्यासाठी तुपाचा (ghee) वापर सर्सास केला जातो. तुपात फोडणी देण्यापासून ते मिठाई (sweet) बनवण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात तूप (ghee) वापरलं जातं. तुपामुळे पदार्थाला एक वेगळी चव आणि सुगंध येतो. मात्र प्रत्येक घराच्या किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या तूपात आजकाल भेसळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण शुद्ध देशी तुपात (Desi ghee) भेसळ आहे की नाही हे तुम्ही घरीच तपासू शकता.

देशी तुपात (Desi ghee) अनेकदा नारळाचे तेल (coconut oil) मिसळले जाते. अशावेळी भेसळयुक्त तूप  ओखळण्यासाठी, काचेच्या भांड्यात थोडं तूप घ्या आणि डबल बॉयलर (double boiler) प्रक्रिया वापरून ते वितळवा. आता हे मिश्रण एका बरणीत टाका आणि काही वेळ फ्रीजमध्ये (refrigerator) ठेवा. थोड्या वेळाने तूप वेगवेगळ्या थरांत घट्ट झाले तर तुपात (ghee) भेसळ झालेली आहे.

देशी तूप तपासण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे ते हातावर घेऊन तपासणे. तुमच्या तळहातावर एक चमचा तूप घ्या आणि ते वितळेपर्यंत काही वेळ थांबा. तूप वितळायला लागले तर शुद्ध आहे, तसेच राहिले तर भेसळयुक्त आहे.

तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये एक चमचा तूप टाका आणि गरम करा. आता चिमूटभर साखरेसोबत समान प्रमाणात कॉन्सेंट्रेटेड एचसीएल मिसळा. ती ट्यूब हलवा आणि सर्व पदार्थ एकत्र करा. खालच्या थरात गुलाबी किंवा लाल रंगाचे दाणे दिसले तर तूप भेसळयुक्त असेल.

शुद्धता तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते पॅनमध्ये वितळणे. बारिक गॅसवर पॅन ठेवा आणि तो थोडा वेळ गरम होऊ द्या. आता त्यात एक चमचा तूप घाला. जर तूप लगेच वितळले आणि गडद तपकिरी रंगाचे झाले तर ते शुद्ध तूप आहे. जर ते वितळण्यास वेळ लागला आणि फिकट पिवळा झाला तर ते भेसळयुक्त आहे.

 तूप खाल्याने होणारे फायदे तुम्हाला माहितीयेत का? 

1. तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.

2. रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.

3. शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.

4. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.

5. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.

6. गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदेशीर ठरतं.

7. उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं.

8. डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

9. शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं.

10. तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे.