मुंबई : तमालपत्राचा (दालचिनीची पाने) जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या पानांचे तेलही काढले जाते. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते. याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक असते. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. तमालपत्र खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे.
- तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा. तमालपत्रामुळे पोटाचे विकार दूर होतात. चहामध्ये तमालपत्रचा वापर केल्याने कफ, अॅसिडिटी, पित्त या आजारांवर तुम्हाला आराम मिळू शकतो.
- तमालपत्र रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतं. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी तमालपत्राचे सेवन करणे गरजेचे आहे.
- तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल, तर तमालपत्राचे सेवन करा. त्यामुळे चांगली झोप येते. त्यासाठी तमालपत्राच्या तेलाचा उपयोग करा. तमालपत्राच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्यावे.
- तमालपत्राने किडनी स्टोन (मुतखडा) आणि किडनीसंबंधीत असणाऱ्या समस्या दूर होतात. तमालपत्र पाण्यात घालून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड कारावे. हे पाणी प्यायल्याने किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर मात करता येते.