Cholesterol Symptoms and Causes News In Marathi : आजकाल कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढण्याची समस्या ही खूपच सामान्य झाली आहे. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना हैराण करतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणारा पदार्थ आहे जो आपल्या शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा आणतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका निर्माण करु शकतो.
साधारणपणे कोलेस्टेरॉलचे (Cholesterol Symptoms) दोन प्रकार आढळतात. कमी घनता लिपोप्रोटीन आणि उच्च घनता लिपोप्रोटीन. कमी घनतेचे लिपोप्रोटीन हे वाईट कोलेस्टेरॉल असते. ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लाग जमा करते. तर उच्च घनता लिपोप्रोटीन शरीरासाठी आवश्यक आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे आपला आहारात बदल होत असतो. परिणामी बरेच लोक आजारी पडतात. परंतु आपले शरीर आपल्याला वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे संकेत देते. कोणती लक्षणे आहेत ते जाणून घेऊया.
एनजे कार्डिओव्हस्कुलर इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये नेहमीपेक्षा जडपणा जाणवत असेल तर तुम्ही त्वचेची कोलेस्ट्रॉल चाचणी करावी. पोटऱ्या किंवा मांड्यांमध्ये जडपणा दिसून येतो. चालताना या वेदना वाढतात. कोलेस्टेरॉलचा धोका शरीराच्या खालच्या भागांमध्ये, टाच, पायांची बोट यांमध्ये या कोलेस्ट्रेरॉलचा त्रास जास्त जाणवतो. यामुळे धमन्या डॅमेज होण्याचा धोका असतो.
वाचा: ही संधी सोडू नका! सोने-चांदीच्या खरेदीवर होईल 'इतकी' बचत
वातावरणात गारवा आला की पाय थंड पडतात. पण कारण न नसताना तुमचे पाय थंड पडत असतील किंवा तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसातही सर्दी होण्याची भीती वाटू शकते आणि त्याचे कारण कोलेस्ट्रॉल वाढणे असू शकते. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच रक्त तपासणी करायला हवी.
रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित नसल्यास, शरीराच्या काही भागांमध्ये रक्त प्रवाह व्यवस्थित होत नाही. त्यामुळे त्वचेचा रंग बदलतो. परिणामी कोलेस्टेरॉल वाढते. त्वचेच्या रंगात बदल झाल्यास दुर्लक्ष करू नका.
तुमच्या शरीरावर कुठेही दुखापत झाल्यानंतर खूप रक्तस्त्राव होत असेल आणि रक्ताभिसरण नियमित होत नसेल तर ते कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण असू शकते. मधुमेहाशिवाय इतरही अनेक कारणे असू शकतात. तपासानंतर अधिक माहिती मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)