जिभेवर काळे डाग दिसू लागले तर सावधान, याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

यापासून सुटका करण्यासाठी कडुलिंबाची पाने हा उत्तम उपाय आहे.

Updated: Jul 25, 2022, 10:22 PM IST
जिभेवर काळे डाग दिसू लागले तर सावधान, याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका title=

मुंबई : आपलं शरीर हे वेगवेगळ्या अवयवांनी बनलेलं आहे. आपल्या शरीराच्या अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु असतात. जे आपल्याला बाहेर सहजासहजी जाणवत नाही, परंतु आपलं शरीर वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला हिंट देत असतं. ती लक्षणे जर तुम्ही ओळखलीत, तर तुम्हाला मोठ्या-मोठ्या आजारांचं निदान लवकर करण्यात मदत करते. त्यापैकी एक जीभ देखील आहे. जर तुम्हाला जिभेवर काळे डाग दिसत असतील तर तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ही मधुमेह, अॅनिमिया सारखे आजार होण्याची लक्षणे आहेत.

याशिवाय तोंडाची साफसफाई नीट न केल्यामुळे काळे डागही येऊ लागतात. अशा परिस्थितीत जिभेवरील काळे डाग दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय अवलंबावे, जेणेकरून भविष्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

जीभेवर काळे डाग येण्याचे कारण म्हणजे तोंड व्यवस्थित न साफ​करणे. त्यामुळे नियमितपणे ब्रश करा. पाणी अधिकाधिक प्या. कारण पाण्याच्या कमतरतेमुळेही जिभेवर काळे डाग पडतात.

रात्री ब्रश करून झोपल्यानंतरही जीभेवर घाण बसत नाही. तसेच तुम्ही टंग क्लीनर वापरण्याची खात्री करा. रात्री गोड पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे जिभेवर काळे डागही पडतात.

यापासून सुटका करण्यासाठी कडुलिंबाची पाने हा उत्तम उपाय आहे. तुम्हाला फक्त त्यांची पाने पाण्यात उकळायची आहेत, नंतर ती सामान्य झाल्यावर तुम्ही त्याने चुळ भरु शकता. याशिवाय लसणाची एक कढी जिभेवर चोळल्याने जिभेवरील काळेपणा कमी होतो.

लवंगाच्या पाण्यात कुस्करल्यानेही जिभेचा काळेपणा दूर होतो. त्यात दालचिनी घालून उकळा, मग पाणी कोमट झाल्यावर गार्गल करा. हे सर्व उपाय नियमितपणे केले तर ते प्रभावी ठरतील.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)