सावधान! नेहमीच्या वापरात असलेली 48 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल

Drugs Fail in Quality Test : तुम्ही जर नेहमीच्या आजारावरील म्हणजेच अँटिबायोटिक्स, मल्टीव्हिटामिन्स, अँटी-डायबेटिक आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी औषध घेत असाल तर आताच सावध व्हा. कारण या औषधासंदर्भाच केंद्र सरकारकडून मोठी बातमी येत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 27, 2023, 10:07 AM IST
सावधान! नेहमीच्या वापरात असलेली 48 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल  title=
Drugs Fail in Quality Test

48 Drugs Fail Latest Quality Test : हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आजारांना सामोरे जात असतो. डोकेदुखी, पित्त, निद्रानाश अशा आजारांना बळी पडतो. यावर उपाय म्हणून मल्टीविटामिन्स, अँटीबायोटिक्स, अँटी-डायबेटिक सारखी औषधे घेतो. मात्र या औषधांसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येते. भारतात नियमितपणे वापरल्या जाणार्‍या तब्बल 48 औषधांची गुणवत्ता चाचणी फेल असल्याची माहिती केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (Central Drugs Standard Control Organisation) दिली आहे.   

देशात प्रमाणित चाचणीत 48 औषधांचे नमुने फेल झाले असून यामध्ये हृदयविकारावर वापरले जाणारे औषधांसह यामध्ये एपिलेप्सी औषध गॅबापेंटिन, उच्च रक्तदाब औषध टेल्मिसार्टन, मधुमेहावरील औषध संयोजन ग्लिमेपिराइड आणि मेटफॉर्मिन आणि एचआयव्ही औषध रिटोनाविर यासारख्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या औषधांचा समावेश आहे. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये तेलमा, तेलमिसार्टन आणि अमलोडिपिन किंवा इतर औषधांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.

तसेच सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या तपासणी अहवालात उत्तराखंडमध्ये उत्पादित 14 औषधांचा समावेश आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशात 13, कर्नाटकात 4, हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये 2-2 आणि गुजरात, मध्य प्रदेश, सिक्कीम, जम्मू आणि पुद्दुचेरीमध्ये 1-1 औषधे आहेत. गेल्या महिन्यात एकूण 1497 औषधांच्या नमुन्याच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 48 औषधी मानकांची पूर्तता केलेली नाहीत.

वाचा : महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमतीत वाढ, एका लीटरसाठी किती रुपये मोजावे लागणार? 

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने दिलेल्या धक्कादायक माहितीत, या औषधांमध्ये, Lycopene Mineral Syrup सारखी औषधे देखील आहेत. ज्याचा औषधांचा वापर रोजच्या जीवनात केला जातो याशिवाय व्हिटॅमिन सी इंजेक्शन, फॉलिक अॅसिड इंजेक्शन, अल्बेंडाझोल, कौशिक डॉक-500, निकोटीनामाइड इंजेक्शन, अमोक्सॅनॉल प्लस आणि अल्सीफ्लॉक्स सारखी औषधे आहेत. ही औषधे जीवनसत्वाची कमतरता पूर्ण करण्यासाठी, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, ऍलर्जी टाळण्यासाठी, ऍसिड नियंत्रण आणि बुरशीजन्य संसर्ग दूर करण्यासाठी वापरली जातात. या औषधांमध्ये एका नामांकित कंपनीची टूथपेस्टही निकामी झाली आहे. मोठ्या संख्येने लोक या टूथपेस्टचा वापर केला जात आहे. 

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने त्यांच्या वेबसाइटवर जारी केलेल्या मासिक यादीमध्ये, मार्च महिन्यात चाचणी केलेल्या एकूण 1,497 नमुन्यांपैकी 48 औषधांच्या बॅच गुणवत्तेच्या मानकांमध्ये अपयशी ठरल्या आहेत. यादीत औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा सौंदर्यप्रसाधने समाविष्ट केले असून ती औषधे मानक दर्जाची नाही, बनावट, भेसळयुक्त आणि चुकीच्या ब्रँडेडची असल्याचे निदर्शनात आले आहे.