पाकिस्तानपर्यंत पोहोचला मंकीपॉक्स, भारताला यामुळं किती धोका?

Monkeypox Outbreak: कोरोना पाठ सोडत नाही तोच हा मंकीपॉक्सचा संसर्ग चिंता वाढवताना दिसत आहे. पण, घाबरून जाण्यापेक्षा योग्य माहिती आणि उपचारांच्या बळावर या संसर्गावरही मात करता येते. त्यामुळं चुकीची माहिती पसरवू नका.   

Updated: Apr 26, 2023, 11:33 AM IST
पाकिस्तानपर्यंत पोहोचला मंकीपॉक्स, भारताला यामुळं किती धोका?  title=
Pakistan Monkeypox how much will it cause risk for india latest health news

Monkeypox Outbreak in Pakistan: इथं कोरोना जगभरातून काढता पाय घेणार असं वाटत असतानाच या संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आणि पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेपासून देशविदेशातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या. त्यातच चिंता वाढवली ती म्हणजे आणखी एका संसर्गानं. हा संसर्ग आहे, Monkeypox. पाकिस्तानच्या परदेश मंत्रालयाच्या माहितीनुसार नुकतंच देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य अभिनयान आणि समन्वय मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. 

17 एप्रिल रोजी सौदी अरब येथून निघालेल्या या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची काही लक्षणं आढळली होती. त्यांच्यासोबत विमान प्रवासादरम्यान एका दुसऱ्या व्यक्तीमध्येही अशीच लक्षणं आढळली आणि भीती वाढली. सध्याच्या घडीला मंकीपॉक्सनं बाधित असणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेलण्याच आली असून, पुढील चाचणीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने NIH इस्लामाबाद येथे पाठवण्यात आले आहेत. 

हेसुद्धा वाचा : मेनोपॉज ची लक्षणं कोणती? पाळी थांबायच्या आधी 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पीडित रावळपिंडी किंवा इस्लामाबादचेच रहिवासी असून आता त्यांच्या नातेवाईकांचीही चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंकीपॉक्सचा फैलाव देशात होऊ नये, यासाठीच आरोग्य यंत्रणा तातडीनं काही महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहे. सध्याच्या घडीला या संसर्गाची लागण झालेल्या रुग्णाला पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेसमध्ये पाठवण्यात आलं असून, लक्षणं असणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाला गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. 

जगभरात कोरोनासह मंकीपॉक्सचीही दहशत 

सध्याच्या घडीला जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत वाढलेली असतानाच मंकीपॉक्सचे रुग्णही आढळू लागले आहेत. पाकिस्तानमध्ये या संसर्गाचा रुग्ण सापडण्यापूर्वी आफ्रिकेतून यासंदर्भातील माहिती समोर आली होती. तर, मागील वर्षी 14 डिसेंबरला जागतिक स्तरावर 103 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यावेळी 59 हजार 179 रुग्ण बाधित असल्याचं कळलं होतं. 

आतापर्यंत मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण युरोप, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेमध्ये आढळले होते. भारतातही 2022 मध्ये या संसर्गाची लागण झालेले रुग्ण आझळल्यामुळं भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेजारी राष्ट्रात म्हणजेच पाकिस्तानमध्ये या संसर्गाचा फैलाव होत असल्याची प्राथमिक माहिती असल्यामुळं भारतातही आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

काय आहेत या संसर्गाची लक्षणं? 
- ताप येणं 
- डोकेदुखी 
- मांसपेशींमध्ये वेदना 
- पाठदुखी 
- अशक्तपणा 
- सूज येणे