डाग दूर करण्यासाठी जरुर वापरा बटाट्याचा हा फेसपॅक

बटाट्याचा वापर हा नेहमी भाजी आणि खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातोय मात्र या बटाट्यापासून तुम्ही फेसपॅकही बनवू शकता.

Updated: Jun 8, 2018, 11:32 PM IST
 डाग दूर करण्यासाठी जरुर वापरा बटाट्याचा हा फेसपॅक title=

मुंबई : बटाट्याचा वापर हा नेहमी भाजी आणि खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातोय मात्र या बटाट्यापासून तुम्ही फेसपॅकही बनवू शकता. कच्च्या बटाट्याचा रस चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी होतो. मात्र यासोबतच चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठीही बटाट्याचा वापर होतो. कच्च्या बटाट्याचा रस त्वचेवरील ओपन पोर्स बंद कऱण्यासाठी होतो. यातील स्टार्च एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. चेहरा चमकवण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर सुरु करा. जाणून घ्या बटाट्यापासून बनवले जाणारे हे फेसपॅक

ड्राय स्किनसाठी बटाटा आणि दही

जर तुमची स्किन कोरडी असेल तर चेहऱ्यावर दही आणि बटाट्याचा फेसपॅक लावा. यासाठी २ ते ३ चमचे बटाट्याचा रस आणि एक चमचा दही मिसळून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा.

स्किन टॅनिंगसाठी बटाटा आणि अंडे

उन्हामुळे त्वचा काळवंडली गेली असेल एका बटाट्याचा रस काढून त्यात एक चमचा अंड्याचा सफेद भाग आणि एक चमचा दही टाका. हे मिक्सरमध्ये वाटून चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.

चेहरा उजळवण्यासाठी बटाटा आणि हळद

चेहरा उजळवण्यासाठी बटाट्याच्या रसात चिमूटभर हळद मिसळून हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. ३० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा

डार्क सर्कलासाठी बटाटा

डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्यास कच्चा बटाटा कापून फ्रीजरमध्ये ठेवून थंड करा आणि दोन्ही डोळ्यांवर २० मिनिटे ठेवा. यामुळे डार्क सर्कल दूर होण्यास मदत होईल.