मुंबई : आज आम्ही तुम्हाला शेंगदाणाच्या अशाच काही चमत्कारी फायद्यांबद्दल सांगणार आहोत, जे जाणून घेतल्यानंतर रोजच्या जीवनातील एखाद्या गोष्टीचे इतके फायदे तुम्हाला होतील यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवते. शेंगदाण्यामध्ये असे गुणधर्म आहेत, जे सहजपणे चयापचय गतिमान करतात, ज्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळण्यास आणि पोट कमी करण्यास देखील मदत होते. त्यामुळे याबद्दल माहिती घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.
सर्वप्रथम शेंगदाण्यात काय आणि कोणते घटक असते ते आपण जाणून घेऊयात.
शेंगदाण्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियमसारखे आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात.
1. टाईप 2 मधुमेहामध्ये फायदेशीर
एका संशोधनात असे दिसून आले आहे की, शेंगदाणे खाल्ल्याने महिलांना टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. शेंगदाणे हे कमी ग्लायसेमिक अन्न आहे, ते खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही.
2. जळजळ कमी करते
शेंगदाणे हे फायबरचा एक चांगला स्रोत आहे, जे तुमच्या शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते, तसेच तुमची पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत करते.
3. कर्करोगाचा धोका कमी होतो
शेंगदाणे किंवा पीनट बटर खाल्ल्याने गॅस्ट्रिक नॉनकार्डिया एडेनोकार्सिनोमा नावाचा विशिष्ट प्रकारचा कोलन कर्करोग होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
4. हृदयासाठी फायदेशीर
भुईमूग हे इतर सुक्या मेव्यांप्रमाणेच हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. शेंगदाणे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयविकार टाळण्यास मदत करते.
5. आयुष्य वाढवते
एका संशोधनात असे दिसून आले आहे की, जे लोक नियमितपणे कोणत्याही प्रकारचा सुकामेवा खातात (शेंगदाण्यासह) त्यांचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता कमी होते. भुईमुगामुळे मृत्यूदर कमी होतो. म्हणूनच याला 'गरीबांचा बदाम' म्हणतात.
शेंगदाणे हे बदामाइतकेच पौष्टिक आहे, तर किंमतीच्या दृष्टीने खूपच स्वस्त आहे. यामुळेच शेंगदाण्याला गरीबांचा बदाम आणि देशी काजू असेही म्हणतात.
रात्री झोपण्यापूर्वी सुमारे 6 ते 8 तास शेंगदाणे पाण्यात भिजत ठेवा, यामुळे त्यातील पित्त बाहेर पडते आणि परिणाम देखील सामान्य होतो. मग सकाळी तुम्ही ते नाश्त्यापूर्वी किंवा सोबत खाऊ शकता. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, रात्री शेंगदाणे खाणे टाळा कारण शेंगदाणे पचायला जास्त वेळ लागतो.