benefits of oranges: संत्री ही सगळ्यांनाच आवडतात. संत्री आंबट गोड चविष्ट असण्यासोबतच रस अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. संत्री आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. संत्रा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करते.
डॉक्टर देखील संत्री खाण्याचा सल्ला मोठ्या प्रमाणात देतात. व्हिटॅमिन सीचा (Vitamin C) सर्वात मोठा स्रोत संत्रा आहे. जे निरोगी त्वचा, मजबूत केस आणि दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे. गर्भधारणेदरम्यान हा रामबाण उपायापेक्षा कमी नाही. आज आम्ही तुम्हाला संत्री खाल्यास काय फायदे होतात ते सांगणार आहोत चला जाणून घेऊया. (Benefits of eating oranges during pregnancy even doctors advise nz)
1. संत्र्यामध्ये 70 टक्के पर्यंत व्हिटॅमिन सी आढळते. फक्त एक संत्री आपल्या शरीरात संपूर्ण दिवसासाठी व्हिटॅमिन सी पुरवू शकते.
2. व्हिटॅमिन-सी शरीरात लोह साठवण्यासाठी आणि उत्तम प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक आहे.
3. तुम्हाला माहित आहे का संत्रामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. संत्र्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करून आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
4. आपल्या शरीराला योग्य प्रमाणात फायबर मिळाल्यास कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि मधुमेहाच्या समस्येपासूनही आराम मिळेल. यासोबतच
5. आपले शरीर डीएनए आणि इतर अनुवांशिक सामग्री बनवण्याचे काम करते. यासाठी बी व्हिटॅमिन फोलेटची आवश्यकता असते.
6. डॉक्टर गर्भवती महिलांना गरोदरपणात संत्री खाण्याचा सल्ला देतात. संत्र्याचे सेवन केल्याने मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होतो.
7. संत्र्यामध्ये 170 पेक्षा जास्त फायटोकेमिकल्स आणि 60 फ्लेव्होनॉइड्स असतात, जे इतर कोणत्याही अँटीऑक्सिडंट अन्न किंवा औषधापेक्षा जास्त असतात.
8. संत्र कर्करोग, संधिवात, मधुमेह, अल्झायमरपासून मुक्त होण्यास मदत करते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)