मधूमेहींसाठी हे ५ सुकामेव्याचे पदार्थ फायदेशीर

   मधूमेह  म्हटला की सगळ्यात पहिलं बंधनं हे खाण्यावर येतं. मग अवेळी लागणार्‍या भूकेच्या वेळेस चूकीचे पदार्थ खाल्ल्यास त्रास अधिक वाढू शकतो. म्हणूनच सुकामेव्यातील या काही पर्यायांची निवड करा. म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत  होते. 

Updated: Nov 21, 2017, 03:04 PM IST
मधूमेहींसाठी हे ५ सुकामेव्याचे पदार्थ फायदेशीर  title=

मुंबई  :   मधूमेह  म्हटला की सगळ्यात पहिलं बंधनं हे खाण्यावर येतं. मग अवेळी लागणार्‍या भूकेच्या वेळेस चूकीचे पदार्थ खाल्ल्यास त्रास अधिक वाढू शकतो. म्हणूनच सुकामेव्यातील या काही पर्यायांची निवड करा. म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत  होते. 

बदाम :

इन्सुलिन सेन्सिटीव्हिटी सुधारण्यासाठी बदाम फायदेशीर ठरतं. त्यामुळे अवेळी भू क लागत असल्यास काही बदाम खाण्याची सवय ठेवा.  

अक्रोड :

अक्रोडमध्ये फायबर घटक मुबलक असतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात राहण्यास मदत होते. तसेच टाईप 2 डाएबिटीस आटोक्यात ठेवण्यास मदत होते. तुमचं वजनही काबुत ठेवण्यासाठी अक्रोड मदत करते.  

काजू :

काजूमध्ये ग्ल्यास्मिक इंडेक्स कमी करण्याची क्षमता आहे. तसेच काजूमध्ये मॅग्नेशियम, मिनरल्स मुबलक असतात. नियमित काजूचा आहारात समावेश केल्यास मधूमेहाचा धोका आटोक्यात ठेवण्यास मदत होते. 

पिस्ता :

पिस्त्यामध्ये फायबर घटक मुबलक असतात. तसेच कॅलेरीज कमी असतात. मधूमेहींसाठी अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पिस्ता फायदेशीर ठरते.  नियमित पिस्ता खाणार्‍यांमध्ये मधूमेहाचा धोका तुलनेत कमी असतो.  

मखाणा :

मधूमेहींसाठी मखाणा फायदेशीर आहे. त्यामध्ये ग्ल्यासमिक इंडेक्स कमी आहे. आमटी, भाज्यांमध्ये मखाणांचा वापर करु शकता. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत होते.