Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल कमी करायचंय मग 'हा' पर्याय निवडा!

 उच्च कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) कोणतीही चिन्हं किंवा संकेत शरीरामध्ये आधीच दिसत नाहीत, म्हणून याला सायलेंट किलर असेही म्हणतात. यामुळे हृदयविकाराच्या झटका येण्याची दाट शक्यता असते.

Updated: Nov 4, 2022, 07:17 PM IST
Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल कमी करायचंय मग 'हा' पर्याय निवडा! title=

Bad Cholesterol: रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असल्याने खराब कोलेस्टेरॉल वाढू लागतं. उच्च कोलेस्टेरॉलची कोणतीही चिन्हं किंवा संकेत शरीरामध्ये आधीच दिसत नाहीत, म्हणून याला सायलेंट किलर असेही म्हणतात. यामुळे हृदयविकाराच्या झटका येण्याची दाट शक्यता असते. सध्याच्या लाखो लोकांना हाय कोलेस्टेरॉलची समस्या असल्याचं दिसून येतं. 

रक्त तपासणीद्वारे तुम्ही रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळीची माहिती घेऊ शकता. अशा परिस्थितीत जर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. आजकाल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत, परंतु औषधांशिवायही तुम्ही नैसर्गिकरित्या उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकता. पण ही पद्धत नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

अल्कोहोलचे सेवन कमी करा

मित्रांसोबत पार्टी करणं आणि दारू पिणं खूप मस्त वाटतं पण तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला दारू पिणं बंद करावं लागेल. जरी कधीकधी तुम्ही अल्कोहोलचं सेवन करू शकता. परंतु दररोज जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते.

वजन कमी करणं

जर तुम्हाला तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमचं वजन आणि लठ्ठपणा कमी करणं महत्त्वाचं आहे. ओटीपोटाच्या सभोवतालची अतिरिक्त चरबी व्हिसेरल फॅट वाढवतं ज्यामुळे तुमच्या लिव्हरवर परिणाम होतो. जास्त वजनामुळे कोलेस्टेरॉलची पातळी देखील वाढते ज्यामुळे तुमच्या रक्त पेशींवर वाईट परिणाम होतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकस आहार घेणं आणि जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करणं महत्त्वाचं आहे.