स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळे जळजळतात? बाबा रामदेव यांचे उपाय करा फॉलो

Eye Care Tips by Baba Ramdev in Marathi: हल्ली मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि टीव्हीच्या स्क्रिन टाईममध्ये वाढ झाली आहे. यामुळे डोळ्यांची जळजळ, पाणी येणे यासारख्या समस्यामध्ये वाढ होतेय. अशावेळी योगगुरु बाबारामदेव यांनी सांगितलेल्या या टिप्सने नक्की होईल फायदा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 7, 2024, 04:30 PM IST
स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळे जळजळतात? बाबा रामदेव यांचे उपाय करा फॉलो  title=

Eye Care Tips by Baba Ramdev in Marathi:इंटरनेटच्या युगात आपले काम मोबाईल-लॅपटॉपशिवाय होऊ शकत नाही. पर्यायाने आपल्यापैकी अनेकांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. डोळ्यांशी संबंधित समस्या वाढतात आणि मग त्रास सहन करावा लागतो. तुम्हालाही कधीकधी वेदना होत असतील तर ठीक आहे. पण डोळ्यांत सतत दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. बाबा रामदेव यांनी सांगितलेल्या या टिप्सने डोळ्यांचा त्रास कमी होऊ शकतो. 

डोळे हा अतिशय संवेदनशील अवयव आहे, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजकालच्या जीवनशैलीचा आपल्या डोळ्यांवर खूप वाईट परिणाम होत आहे. दिवसाचा बराचसा वेळ मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा टीव्हीसमोर घालवल्याने डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो. तुमच्या लक्षात आले असेल की, जेव्हा तुम्ही टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करता तेव्हा तुम्ही नेहमीपेक्षा खूपच कमी ब्लिंक करता. अशा परिस्थितीत डोळे कोरडे होण्याचा धोका असतो. तर दुसरीकडे या गॅजेट्समधून निघणारा निळा प्रकाशही डोळ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवरही परिणाम होतो.

डोळ्यांमध्ये अतिशय संवेदनशील आणि बारीक नसा असतात. त्याशिवाय डोळयातील पडदा आणि इतर अनेक भाग असतात, जे आपल्याला पाहण्यात मदत करतात. पण मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक आजार डोळ्यांवरही परिणाम करतात. मधुमेह झाल्यास शरीरात रक्तातील साखर वाढते. ही रक्तातील साखर डोळ्यांच्या बारीक नसा आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे व्यक्ती अंध देखील होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखणे अत्यंत आवश्यक आहे.

अनुलोम-विलोम प्राणायाम 

अनुलोम-विलोम प्राणायाम डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. जर आपण याला आपल्या दिनचर्येचा भाग बनवले आणि त्यासाठी नियमितपणे वेळ काढला तर डोळ्यांच्या दुखण्यासह अनेक समस्या दूर होऊ शकतात.

भ्रामरी प्राणायाम

भ्रामरी प्राणायामला 'हमिंग बी ब्रीदिंग' तंत्र म्हणूनही ओळखले जाते. असे नियमित केल्याने डोळ्यांना आराम मिळतो. यामुळे दृष्टीही सुधारते. हा प्राणायाम झोप, रक्तदाब आणि तणाव कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.

भस्त्रिका प्राणायाम 

दृष्टी सुधारण्यासाठी भस्त्रिका प्राणायाम प्रभावी मानला जातो. प्राणायाम केल्याने आपले डोळेच नव्हे तर आपले मनही ताजे आणि निरोगी राहते. हे आपल्या शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि अशुद्धता दूर करण्यासाठी देखील ओळखले जाते.

घरगुती उपाय 

  • महात्रिफला घृत चूर्ण 1 चमचा दूधातून प्या 
  • दिवसातून दोनदा प्या हे दूध 
  • ऍलोवेरा-आवळा ज्यूस प्या. यामुळे डोळे चांगले होतात. 
  • गुलाब पाणी आणि त्रिफळा चूर्ण पाणी डोळ्यांची जळजळ दूर करतात. 
  • मनुके, बदाम आणि अंजीर खाल्ल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)