बदामाचे फायदे आणि भिजवूनच का खावे बदाम?

हिवाळ्यात पौष्टिक आहार घ्यावा असं सांगितलं जातं. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 26, 2017, 03:48 PM IST
बदामाचे फायदे आणि भिजवूनच का खावे बदाम?  title=

मुंबई : हिवाळ्यात पौष्टिक आहार घ्यावा असं सांगितलं जातं. 

अशात बदाम हे सर्वात पौष्टिक पदार्थ आपल्या आहारात असणं अत्यंत गरजेचं आहे. बदामाने शरिरात ऊर्जा निर्माण होते. तसेच तुम्ही वजन घटवण्याच्या मिशनवर आहात ? मग नियमित भिजवलेले बदाम अवश्य खावेत. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी रिलेटेड मेटॅबोलिक डिसऑर्डर’ यांच्या अहवालानुसार बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते. जिम आणि डाएटशिवाय घटवा दिवसभरात 500 कॅलरीज !

बदामाचे उपयोग 

१. बदाम बी बुद्धी साठी उपयुक्त असून रात्री गायीच्या एक कप कोमट दुधात दोन बदाम भिजत घालावेत आणि सकाळी ७ वाजता अनशापोटी दुधासह त्यांचे सेवन करावे ... शारीरिक क्षमता आणि बुद्धी दोन्ही वाढायला मदत होते.२. बदामची पेस्ट तयार करून ती मुलतानी मातीत मिसळून लेप करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा तेजस्वी दिसतो... चेहऱ्याची त्वचा काळवंडली असेल तर हा साधा घरगुती उपाय आहे ... या लेपात गुलाबपाणी आणि दुध वापरावे ३. अंगाची खाज कमी येत नसेल तर बदाम तेलाने मालिश करावी ... लहान मुलांनाही मालिश साठी बदाम तेल उत्तम आहे
४. केसांसाठी देखील बदाम तेल उत्तम असून डोक्याला मालिश केली कि केशवृद्धी आणि बलवृद्धी असे अद्भुत गुणधर्म त्यात दिसतात.
५. वाताच्या आजारात बदाम तेल थेट पोटात घ्यायची योजना पण करता येते पण त्यासाठी रुग्णाचा अभ्यास करता येतो.
६. हिवाळ्यात बदाम पाक खायला सुरवात करा . वर्षभराची शक्ती मिळायला मदत मिळते.
७. बदामाचे तेल योनीकंडू या त्रासदायक आजारात अत्यंत उपयुक्त आहे ... 

बदाम का भिजवून खावेत? 

बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स यासारखे अनेक पोषक तत्व असतात. बदाम हे पाण्यात भि़जवून खाल्ले पाहिजेत कारण यामुळे त्याच्यावरचं टरफल किंवा साल ही बदामावरुन सहज निघून जाते.बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल निघून जाणं अधिक महत्त्वाचं असतं.

 मधुमेह झाल्यास फायदेशीर आहे बदाम.

मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते. जेवणानंतर रक्तात वाढणारी साखरेची पातळी कमी करण्याची ताकद बदामात आहे. याशिवाय यामध्ये ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेशी संबंधित आजारांमध्ये फायदा मिळतो. संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो.