बॉडी बिल्डर्सना सरकार धक्का देण्याच्या तयारीत

व्यायामशाळेत व्यायाम करण्यासोबतच तुम्ही जर, शरीर वाढवण्यासाठी सप्लीमेंटचा आधार घेत असाल तर, वेळीच सावधान. सरकार तुम्हाला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 26, 2017, 02:29 PM IST
बॉडी बिल्डर्सना सरकार धक्का देण्याच्या तयारीत title=

मुंबई : व्यायामशाळेत व्यायाम करण्यासोबतच तुम्ही जर, शरीर वाढवण्यासाठी सप्लीमेंटचा आधार घेत असाल तर, वेळीच सावधान. सरकार तुम्हाला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

फुगलेले बॉडी बिल्डर सरकारच्या रडारवर

देशातील तरूणाई बॉडी बिल्डींगवर विशेष लक्ष देताना दिसत आहे. खास करून 16 ते 28 या वयोगटातील तरूणांचा यावर अधिक भर दिसतो. व्यक्तिमत्वाची छाप पडण्यासाठी शरीरयष्टी महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामळे अनेक तरूणांचे तासच्या तात व्यायामशाळेत व्यतीत होताना दिसतात. पण, काही अतिउत्साही मंडळींना झटपट रिजल्ट हवा असतो. त्यासाठी अनेकदा हे तरूण सप्लीमेंटचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. नेमका अशाच बॉडीबिल्डर्सकडे सरकारचे लक्ष वळले असून, या बिल्डर्सना चाप लावण्यासाठी सरकार विचार करत आहे. त्यासाठी फूड सप्लीमेंटच्या अनधिकृत विक्रीवर बंदी घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

सप्लीमेंटच्या ऑनलाईन विक्रीलाही लागणार चाप

फूड सेफ्टी स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने  (एफएसएसएआय) शरीराला आणि आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या अशा या फूड सप्लीमेंटवर कारवाई करण्याची तयारीही केली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, क्रिएटीन मोनोहाइड्रेटचा वापर ज्या फूड सप्लिमेंटमध्ये अधिक प्रमाणात केला असेल, अशा सप्लिमेंटवर प्रामुख्याने कारवाई केली जाणार आहे. खास करून ऑनलाईन बाजारात फूड सप्लीमेंट विक्रीचा चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळे या विक्रीची ऑनलाईन नाकेबंदी करण्यावरही भर दिला जाणार आहे. खास करून ई-कॉमर्स कंपन्यांना या संदर्भात नोटीसा दिल्या जाणार आहेत. तसेच, रोखीने फूड सप्लीमेंटची विक्री करणाऱ्या कंपन्यांवरही छापेमारी करण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे सूत्रांची माहिती आहे.

देशभरात छापेमारीची तयारी

दरम्यान, फूड सप्लीमेंटवर कारवाई करण्यासाठी देशभरातील फूड सेप्टी कमिशनर, सेट्रल लायसेसिंग ऑथेरीटींना आदेश देण्यात आल्याचे समजते. या अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील फूड सप्लीमेंटच्या अनधिकृत विक्रीवर कारवाई करावी असे आदेश आहेत.

कारवाई करायची आहे पण कायदाच नाही

दरम्यान, विशेष असे की, क्रिएटिन मोनोहाइड्रेटचा वापर आणि त्याच्या विक्रीबाबत भारतात अद्याप कोणताही कायदा किंवा नियम नाही. एफएसएसएआयने दिलेल्या माहितीनुसार देशात सुमारे 13 कंपन्या अशा आहेत. ज्यांनी परवाना तर, कायदेशीर पद्धतीने घेतला. पण, अवैध मार्गाने क्रिएटिन मोनोहाइड्रेट बनविण्यास सुरूवात केली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टने हे हानिकारक आहे. त्यामुळे यावर रोख लावण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे अमॅझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि हॉमशॉप 18.कॉम आदी संकेतस्थळांना नोटीसा देण्यात येणार आहे. ज्या ऑनलाईन व्यावसाय करतात.

क्रिएटीन मोनोहाइड्रेटचे साईड इफेक्ट्स

तज्ज्ञांची माहिती अशी की, क्रिएटिनचा वापर हा मांसपेशींच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने होतो. पण, त्याचे नियमीत सेवन आरोग्यास हानीकारक आहे. जे लोक नियमीतपणे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यांना स्ट्रोकची समस्या निर्माण होऊ शकते. खास करून किडणी, हृदयरोग यांच्या समस्या निर्माण होतात. डायरिया, डोकेदुखी, उल्डी असा त्रास वाढतो.