बदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. काय म्हणाले?

Almonds : ड्रायफूड खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती तेज होते. पण त्याशिवाय बदाम हे कोलेस्ट्रॉल-मधुमेहा सारख्या आजारांवर रामबाण उपाय असल्याचं एम्सच्या डॉक्टरांचं म्हण आहे.   

नेहा चौधरी | Updated: Jul 31, 2023, 05:45 AM IST
बदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. काय म्हणाले? title=
almonds benefits cholesterol diabetes cancer health news

Almond Benefits : आज प्रत्येक जण आपल्या आरोग्याविषय जागृत झालं आहे. खाण्यापिण्यापासून योगा जीममधून व्यायामावर भर देतात. आज महिला आणि पुरुष दोघींही कामावर जातात. अशावेळी 24/7 एनर्जेटी राहण्यासाठी ड्राय फ्रूट  म्हणजेच सुका मेवा (dry fruits) हे सूपरफूड प्रत्येक जण आपल्याजवळ ठेवतं. सुका मेव्यामध्ये काजू, पिस्ता, बदाम, बेदाणे, अंजीर, खजूर यांसारखे ड्रायफ्रुट्स आणि नट्स हे जेवढे चविष्ट असतात तेवढंच ते आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर (Properties and benefits) असतात. (almonds benefits cholesterol diabetes cancer health news)

या सुका मेव्यातील बदाम हा अनेक गंभीर आजारांवर रामबाण औषध असल्याचं दिल्लीच्या प्रसिद्ध हॉस्पिटल एम्सच्या डॉक्टर यांचं म्हण आहे.  ते म्हणतात की, बदाम हा कोलेस्ट्रॉल-मधुमेहाचा शूत्र आहे.  बदामात निरोगी चरबी, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांच मोठ्या प्रमाणात स्त्रोत उपलब्ध आहे.  त्यासोबतच फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅंगनीज, मॅग्नेशियम देखील इवल्याशा बदामात आढळतात. तसंच प्रथिने, लोह, तांबे, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी 2 चा देखील यात भरपूर आढळतं. दिल्ली एम्समधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका शेरावत यांनी बदामाबद्दल सांगितलेले गुपित जाणून घेऊयात. (Good dietary fiber content)

अँटीऑक्सिडंटचं भांडार (Antioxidant)

डॉक्टरांच्या म्हण्यानुसार बदामात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहे. अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावापासून आपल्या दूर ठेवण्यास मदत करतो. ज्यामुळे मच्या पेशींमधील रेणूंचं नुकसान होण्यापासून बचाव होतो. जळजळ, वृद्धत्व आणि कर्करोगासारखे रोगापासून तुम्ही दूर राहता. त्याच बरोबर बदामामध्ये व्हिटॅमिन-ई (Rich in Vitamin E) मोठ्या प्रमाणात असतं.  व्हिटॅमिन-ईचे सेवन केल्याने हृदयविकार, कर्करोग आणि अल्झायमर रोगापासून आपला बचाव होतो. 

कोलेस्ट्रॉलचा शत्रू (Cholesterol)

रक्तामध्ये खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्यास तुम्हाला (Lowers bad cholesterol that is LDL) हृदयविकाराचा (heart disease) धोका निर्माण करतो. त्यामुळे तुम्ही नियमितपणे बदाम खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल घट होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या हृदयाशी संबंधित आजारापासून संरक्षण होतं. बदाम रक्तातील एलडीएल प्रभावीपणे कमी करण्याची ताकद ठेवतो.

त्यासोबतच बदाममध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असतं याचा फायदा रक्तदाब पातळी कमी करण्यास प्रभावी ठरतं. डॉक्टरांनी हे सांगितलं आहे की, उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि मूत्रपिंड निकामी होण्याची भीती वाढते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी बदाम उत्तम (Diabetes)

बदामामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असलं तरी निरोगी चरबी, प्रथिनं आणि फायबरचं प्रमाण अधिक असतं. यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी बदाम रामबाण औषध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तुम्ही नियमित बदामाचं सेवन केल्यास इन्सुलिनचे कार्यही सुधारण्यास मदत होते. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)